सर्पदंशानंतर त्वरित उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू 

रोशन भामरे 
बुधवार, 13 जून 2018

तळवाडे दिगर(नाशिक) - बागलाण तालुक्यातील जुने निरपूर येथील सर्पदंश झालेल्या सुमनबाई बाजीराव दळवी (वय ६०) या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तळवाडे दिगर(नाशिक) - बागलाण तालुक्यातील जुने निरपूर येथील सर्पदंश झालेल्या सुमनबाई बाजीराव दळवी (वय ६०) या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सर्पदंश झाल्यानतर त्वरित त्यांना जुने निरपूर येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे कोणताही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्यावर कोणताही उपचार झाला नाही. रुग्णवाहिका देखील दहा ते पंधरा मिनिटे उशिरा उपलब्ध झाल्याने त्यांना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाला. त्यामुळे उपचारांअभावी त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप पिंटू दळवी या मृत्यू झालेल्या महिलेच्या मुलाने दिली.

 गेल्या वर्षभरापासून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणतीही सुविधा पुरवली जात नसून,कर्मचाऱ्यानी शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवले आहेत. दुपारी दोन नंतर एकही कर्मचारी आरोग्य केंद्रात उपलब्ध राहत नसल्यामुळे रुग्णांना गावात सरकारी दवाखाना असताना खाजगी दवाखान्यात जावे लागते.

जुने निरपूर येथील प्रथमिक केंद्रात गेल्या एका वर्षापासून एकही वैद्यकीय अधिकारी संपूर्ण वेळ थांबत नसून, आरोग्य केंद्र फक्त नावालाच तेथे सुरु आहे. केव्हा हि आरोग्य केंद्रात गेल्यावर संपूर्ण दवाखान्याच्या खोल्या व खुर्च्या देखील रिकाम्याच दिसत असतात. त्यामुळे परिसरातील गावातील माता भगिनी प्रसूतीसाठी आल्यावर त्यांना कोणताही उपचार व माहिती न देता सरळ सरळ सटाणा येथे पाठविले जाते.

जुने निरपूर येथील आरोग्यकेंद्रात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असून वैद्यकीय अधिकाऱ्याकडूनही असमाधान कारक कामकाज होते तसेच दवाखाना परिसरात मोठ्या प्रमाणत अस्वच्छ तसेच अपुरा औषधसाठा या गोष्टीना कंटाळून आज (मंगळवार) गावातील ग्रामस्थांना दवाखाना परिसरात आंदोलन केले.

सगळेच कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणावर राहतात. वेळेवर रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही.औषधांचा साथा  शिल्लक नसल्याचे सांगणे,रात्रीच्या वेळी उपचार होत नाही.असा प्रकार सर्रास चालू असून पुढील आठ दिवसात कामकाजात सुधारणा न झाल्यास दवाखान्याला टाळे ठोकू.  
- किरण पाटील, तालुका अध्यक्ष अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस 

आरोग्य केंद्रात त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, कमर्चार्यांनी दुपारी दोन नंतर निघून न जाता संपूर्ण वेळ काम करावे व रात्र वेळेसाठी देखील कर्मचारीवर्ग वर्गाची नेमणूक करावी
-भूषण बोरसे, ग्रामस्थ जुने निरपूर

Web Title: Death of a woman due to lack of immediate treatment