बहुजनांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी : लक्ष्मण माने 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

नगर :  आता गरीब विरुद्ध श्रीमंत अशी घुसळण सुरू झाली आहे. वंचितांपैकी कोणी पिढीजात तर कोणी आर्थिक वंचित आहे. देशात 80 ते 85 टक्‍के लोक वंचित आहेत. सरकारमध्ये प्रतिनिधित्व केवळ कोट्यधीशांना मिळत आहे. गेल्या 70 वर्षांत भटक्‍या विमुक्‍तांचा, शेतमजूर, अल्पभूधारकांचा प्रतिनिधी संसदेत गेलेला नाही. त्यामुळे बहुजनांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सुरू केली आहे, "उपरा'कार लक्ष्मण माने यांनी आज स्पष्ट केले. 

वंचित बहुजन आघाडीची बैठक व सभा आज नगरमध्ये झाली. त्या वेळी माने बोलत होते. "न खाउंगा, न खाने दुँगा' म्हणत सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबानी यांना खाऊ घालत आहेत, अशी टीकाही माने यांनी केली. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर, ऍड. विजय मोरे, आमदार हरिदास भदे, राज्य चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, अरुण जाधव, सुनील शिंदे, किसन चव्हाण, नीलिमा बंडेलू, डॉ. जालिंदर घिगे, अनंत लोखंडे, भि. ना. दहातोंडे, अशोक सोनवणे, अर्शद शेख आदी उपस्थित होते. 

खासेराव शितोळे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदानयंत्रात एक लाख 83 हजार जास्त मतदार आढळून आले. ऍड. आंबेडकर यांनी याबाबत शितोळे यांच्याशी चर्चा केली. 

जाळा त्या झोळ्या 
डवरी गोसावी समाजाची माणसे मारली गेली आणि समाज जात व झोळ्या सांभाळत आहेत. जाळा त्या झोळ्या. हाताला कामधंदा का मिळत नाही, याचा विचार करा. बौद्ध धर्म स्वीकारला, पोथ्या व जाती नाकारल्या म्हणून आम्ही माणसात आलो, असे लक्ष्मण माने यांनी सांगितले. 
 
Web Title: Deccedes of Bahujan Leaders to get representation for the Bahujan Samaj: Laxman Mane