नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा; भाकप, किसान सभेची मागणी

nandgao
nandgao

नांदगांव : सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने कष्टपूर्वक व महागडे बी-बियाणे खते यावर लाखो रुपये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया गेल्यातच जमा असल्याने भयावह स्थिती उदभवली असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा अशी मागणी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज येथील तहसिल कार्यालयावर शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांचा मोर्चा काढून करण्यात आली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य काउन्सिलचे कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे, देविदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सध्या नांदगाव तालुक्याची अवस्था काळजी करावी अशी असून तालुक्याच्या ग्रामीण भागात वाड्यावस्त्यावर शाळेत पदे रिक्त असल्याने शिकवायला शिक्षक नाही, वनजमिनीचे तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या अनेक दाव्यांपैकी बहुतांशी दाव्यांचा निर्णय होऊ न शकल्याने प्रलंबित आहेत ते निकाली काढावेत तसेच राज्यघटना संविधान प्रत दिल्ली येथे जळणाऱ्या चा निषेध. कठोर कारवाई करण्यात यावी ) शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या. जनावरांनसाठी चारा छावण्या उभारा किंवा चारा उपलब्ध करून द्या. नांदगांव तालुक्याला मांजरपाडा - 1 मधुन नारपारचे पाणी समन्यायी पध्दतीने द्या.शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ करा.

कसत असलेल्या वनजमिन, गायरान जमिन कसणाऱ्यांच्या नावे करा, पिण्याचे पाणी त्वरित उपलब्ध करून द्या, शेतमजुर, कामगार यांना गावपातळीवरती रोजगार हमीतून काम उपलब्ध करू द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकरी आरक्षण आंदोलक वरील गुन्हे मागे घ्या 353 कलमाचा गैरवापर थांबवा खोट्या केसेस मागे घ्या, शेतकरी शेतमजुरांना पेन्शन दरमहा 7000 देण्याचा कायदा करा यासह इतर इतर मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी यांना सादर करण्यात आले.

विजय दराडे, देवचंद सुरसे, शांताराम पवार, जयराम बोरसे, कोडीराम माळी निंभा आहेर, प्रकाश भावसार, रामदास जाधव श्रवण पवार आदी आपण उपस्थित होते. तत्पूर्वी जेष्ठ दिवंगत कम्युनिस्ट नेते सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल तसेच मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्यासह आत्महत्या केलेल्या शेतकऱयांना आदरांजली भाकप किसान सभा वतीने अर्पण करण्यात आली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com