हिवतापाच्या रुग्णांत लक्षणीय घट! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

जळगाव - विषाणूजन्य आजारांचा होणारा फैलाव रोखण्यासाठी ग्रामपातळीवर शासनाने राबविलेल्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत असल्याने जिल्ह्यातील हिवताप, डेंग्यूची रुग्णसंख्या कमी झाली आहे. चालू वर्षात जानेवारी ते मार्चमध्ये घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये केवळ चारच दूषित नमुने आढळून आल्याची नोंद हिवताप विभागाच्या अहवालावर आहे. 

जळगाव - विषाणूजन्य आजारांचा होणारा फैलाव रोखण्यासाठी ग्रामपातळीवर शासनाने राबविलेल्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत असल्याने जिल्ह्यातील हिवताप, डेंग्यूची रुग्णसंख्या कमी झाली आहे. चालू वर्षात जानेवारी ते मार्चमध्ये घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये केवळ चारच दूषित नमुने आढळून आल्याची नोंद हिवताप विभागाच्या अहवालावर आहे. 

घरासमोर साठलेले पाण्याचे डबके, सिमेंटच्या उघड्या टाक्‍या, धरणाचे साचलेले पाणी आदी ठिकाणी ऍनाफिलिस डासाची उत्पत्ती होऊन हिवतापाचा आजार उद्‌भवतो. प्लाज्मोडीअम परजीवी डासांमार्फत शरीराच्या रक्‍तात पोचतात व आरबीसी पेशींवर हल्ले करतात. यामुळे थंडी भरणे, ताप येणे, अंग थरथरणे यासारखी मलेरियाची लक्षणे दिसून येतात. रक्‍त परीक्षणानंतर ते व्हायव्हॅक्‍स दूषित आढळल्यास 14 दिवसांचा समूळ उपचार व फॅल्सीफॅरम आढळल्यास तीन दिवसांचा उपचार देण्यात येतो. 

एकही मृत्यू नाही 
जळगाव जिल्ह्यात हिवतापाची रुग्णसंख्या कमी झाल्याची नोंद आहे. यात 2013 मध्ये 40, 2014 मध्ये 27 जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच 2015 मध्ये 16, तर 2016 मध्ये 15 रक्ताचे नमुने दूषित आढळले होते. यावर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत एक लाख 10 हजार 680 रक्‍ताचे नमुने तपासणीसाठी घेतले असता यातील केवळ चारच नमुने दूषित आढळून आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांत हिवतापामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 

हिवतापाची लक्षणे 
ऍनाफिलिस डासांच्या मादीमुळे हिवताप होतो. यामध्ये टीएफ आणि टीव्ही हे दोन प्रकार असून, निदान झाल्यानंतर त्यानुसार रुग्णावर उपचार केले जातात. हिवतापावर क्‍लोरोफीन, प्रायोमायसीन या औषधांचे डोस दिले जातात. वयाचा अंदाज घेऊन औषधांचा डोस तीन ते चौदा दिवसांचा असतो. रक्‍त नमुने तपासल्यानंतर या जंतूची माहिती त्वरित मिळते. थंडी, ताप एक दिवस आड करून येणे, तीव्र डोकेदुखी आणि सांधेदुखी ही याची लक्षणे आहेत. वेळेत उपचार झाला, तर रुग्ण गंभीर होत नाही. 

हिवतापासाठी रक्‍त नमुने 
महिना........... रक्‍त नमुने...... दूषित नमुने 
जानेवारी........37,154...................2 
फेब्रुवारी........34,267..................0 
मार्च............39,259...................2 

Web Title: Decline in malaria patients

टॅग्स