चाळीसगाव : तेजस कॉर्नर परिसरात सशस्त्र दरोडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

घरातील सुमारे १५ हजार रोख व दागदागिने असा ऐवज लुटून नेला तसेच घरातील ४ मोबाईल नेत परिसरात मोबाईल फेकून देत पलायन केले. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी भेट देत परिसरात पाहणी केली याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव : शहरातील तेजस कॉर्नर परिसरात असलेल्या शिक्षक कॉलनी परिसरातील वना शेवरे यांच्या राहत्या घरी मध्यरात्री दीडच्या सुमारास सुमारे ५ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला चढविला, यात वना शेवरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव मनोज शेवरे यांच्यावर हल्ला चढवित डोक्यावर टॉमीने वार करीत जखमी केले व कुटूंबातील सदस्यांना मारहाण करीत घरातील ४ ते ५ तोळे सोने नाणे व सुमारे १५ ते २० हजार असा ऐवज चोरुन नेला. यात जखमी मनोज शेवरे यांना उपचारार्थ शहरातील सर्वज्ञ हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे.

प्राप्त माहीती, अशी की शहरातील वना शेवरे हे शिक्षक कॉलनी परिसरात वास्तव्यास असून पत्नी, मुलगा मनोज शेवरे, मुलगी मोनाली, सुन आणि नातवंडे असा परिवार राहत असून घरात पहिल्या रुममध्ये झोपलेले वना शेवरे यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून घरातील बेडरुममध्ये झोपलेल्या कुटूंबातील सदस्यांना मारहाण केली व मनोज शेवरे यांच्या डोक्यावर टॉमीने वार करीत घरातील सदस्यांना घरातील ऐवज लुटून नेला दरोडेखोर हे हिंदी भाषेत बोलले असून बनियान व हाफ पॅंट परिधान केलेले असल्याचे वना शेवरे यांनी सांगितले.

घरातील सुमारे १५ हजार रोख व दागदागिने असा ऐवज लुटून नेला तसेच घरातील ४ मोबाईल नेत परिसरात मोबाईल फेकून देत पलायन केले. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी भेट देत परिसरात पाहणी केली याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: decoit in chalisgaon