केबलधारकांच्या संख्येत झपाट्याने होतेय घट

केबलधारकांच्या संख्येत झपाट्याने होतेय घट

जळगाव - ‘ट्राय’ने ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडण्याचे अधिकार दिले आहेत. त्यांनी निवड केलेल्याच चॅनलचे पैसे ग्राहकांना केबलधारकांकडे द्यावे लागणार आहेत; परंतु ‘ट्राय’च्या धोरणांमुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत असल्याने दिवसेंदिवस केबलधारकांची संख्या कमी होत असल्याने त्याचा फटका लोकल केबल ऑपरेटरांना बसत आहे.

मार्चपर्यंत ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी ‘ट्राय’ने मुदतवाढ दिली आहे. जोपर्यंत ग्राहक आपल्या आवडीचे चॅनल निवडत नाही, तोपर्यंत ग्राहकांना पूर्वीप्रमाणे पैसे घेऊन त्यांना ‘बेस्ट फिट प्लॅन’ देण्याचे आदेश ‘ट्राय’ने सर्व्हिस प्रोव्हायडरांना दिले आहे. त्यानुसार ते ग्राहकांकडून मनोरंजनाचे चॅनेल्स दाखविले जात आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील ग्राहकांकडून केबल ऑपरेटर दोनशे ते अडीचशे रुपये घेत असून, ग्राहकांना १५० ते २०० चॅनल दाखवीत आहेत. याबाबतचे आदेश सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर यांना ‘ट्राय’ने दिलेले असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

‘ट्राय’कडून फसवणूक 
‘ट्राय’कडून दिवसेंदिवस नवनवीन नियम काढले जात आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. ‘ट्राय’च्या धोरणामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांच्या आवाक्‍यापेक्षा अधिक पैसे मोजले लागत आहे. त्यामुळे बदलत्या धोरणांमुळे ग्राहकांची केवळ फसवणूकच होत आहे.

ग्राहकांच्या संख्येत घट
चॅनल निवडीच्या नावाखाली ग्राहकांकडून वाजवीपेक्षा अधिक पैसे घेतले जात आहे. तसेच ग्राहकांना त्यांनी निवड केलेलेच मर्यादित चॅनल बघता येणार असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांकडून ‘ट्राय’च्या धोरणाला विरोध केला जात आहे. त्याचप्रमाणे मनोरंजनावर ग्राहकांकडून अधिक पैशांची मागणी होत असल्याने ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस कमी होत असल्याची माहिती केबल चालकांनी दिली.

‘ट्राय’च्या आदेशाला हरताळ
ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. चॅनल न निवडल्यास ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे चॅनल टीव्हीवर दिसणार नाही. तसेच जोपर्यंत ग्राहक चॅनल निवडणार नाही, तोपर्यंत ग्राहकांना पूर्वीप्रमाणे त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना ‘बेस्ट फीट प्लॅन’ देण्याच्या सूचना सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर यांना दिल्या आहेत. मात्र, काही सर्व्हिस प्रोव्हायडर या आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्याने ‘ट्राय’च्या आदेशाला सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याकडून हरताळ फासले जात आहे.

‘ट्राय’ने दिलेल्या आदेशानुसार ग्राहकांना गेल्या आठवडाभरापासून ‘बेस्ट फीट प्लॅन’ची सुविधा दिली जात आहे. ‘ट्राय’च्या धोरणाचा फायदा हा ब्रॉडकास्ट कंपन्यांना झाला असून, यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक होत आहे.
- विजय चंदेले, जिल्हाध्यक्ष, केबलचालक- मालक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com