महिला आयोगाकडे बदनामीबाबत तक्रार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

व्हॉट्‌सऍपच्या एका ग्रुपवर काही दिवसांपूर्वी महिलांसंदर्भात बदनामीकारक पोस्ट टाकण्यात आली होती. याविरोधात महिलांनी पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याआधी महिला संघटनांनी आंदोलन, निवेदने दिल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल झाले

धुळे - सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश टाकून महिलांची बदनामी करणाऱ्यांची तक्रार राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली. सदस्या देवयानी ठाकरे यांच्याशी माजी महापौर जयश्री अहिरराव, भारती मोरे यांनी चर्चा करून निवेदन दिले.

व्हॉट्‌सऍपच्या एका ग्रुपवर काही दिवसांपूर्वी महिलांसंदर्भात बदनामीकारक पोस्ट टाकण्यात आली होती. याविरोधात महिलांनी पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याआधी महिला संघटनांनी आंदोलन, निवेदने दिल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल झाले. या प्रकाराची गंभीर चौकशी करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी माजी महापौर जयश्री अहिरराव व भारती मोरे यांनी केली आहे. क्षयरोग विभागातील अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाबाबत पीडित तरुणीनेही चौकशीची मागणी केली. या प्रकरणी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशा सूचना सदस्या देवयानी ठाकरे यांनी महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांना दिल्या.
 

Web Title: defamation case