श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट शासनाच्या अधिपत्याखाली आणण्याची मागणी

दिगंबर पाटोळे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

वणी (नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्यावतीने पुरेशा मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने भाविकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच न्यासाच्या विश्वस्त संस्थेवर देवस्थानासाठी आवश्यक वेळ न देणाऱ्या व्यक्तींची निवड होत असल्याने न्यासाचे कार्य धिम्या गतीने होत आहे.

वणी (नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्यावतीने पुरेशा मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने भाविकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच न्यासाच्या विश्वस्त संस्थेवर देवस्थानासाठी आवश्यक वेळ न देणाऱ्या व्यक्तींची निवड होत असल्याने न्यासाचे कार्य धिम्या गतीने होत आहे. गडाच्या सर्वांगिण विकासासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट शासनाने आपल्या अधिपत्याखाली आणण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी भाविकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री रविवारी नांदुरी येथील अटल ग्रामिण आरोग्य महाशिबिराच्या उद्घाटनासाठी आले असता. सप्तशृंगी गडावरील माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची व्यासपीठावर भेट घेत निवेदन दिले. यात सप्तशृंगी गडावर वर्षभरात 70 ते 80 लाख भाविक आदिमायेच्या दर्शनासाठी येतात, गडावर वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. तसेच दिवाळी व इतर सुट्टीच्या दिवशी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यातच महाराष्ट्र सरकारने भारतातील पहिली विदेशी तंत्रज्ञानावर आधारित फनिक्युलर ट्रॉली सिस्टीम खासगीकरणातून उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वृद्ध, आजारी, अपंग भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व वेगाने होत आहे. तसेच या सिस्टीमचा अनुभव व प्रवास करण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक येत असून गडावर दिवसेंदिवस भाविकांचे प्रमाण वाढत आहे. येथे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायत कार्यरत आहे. मात्र ग्रामपंचायत स्तरावर भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यात मर्यादा येत असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन योग्य त्या सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट ही संस्था कार्यरत आहे. न्यासाचे जिल्हा न्यायाधीश पदसिद्ध अध्यक्ष व तहसीलदार हे पदसिद्ध सदस्य आहे. उर्वरित पाच सदस्यांची नेमणूक दर पाच वर्षांनी प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्फत होते. मात्र यात स्थानिकांना डावलण्यात येऊन ज्यांना सामाजिक धार्मिक कार्यात रस नसलेल्या व्यक्तींची नेमणूक होत असल्याने येथील न्यासाचे कार्य गेल्या चार ते पाच वर्षांपासून अत्यंत धीम्या गतीने चालू आहे.

परिणामी भाविकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांवर होत आहे. त्यामुळे भाविकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी या शासन स्तरावरही केलेले आहेत. परंतु त्याची योग्यरीत्या दखल घेतली जात नाही. त्यामुळे या सर्व बाबींवर शासन स्तरावर योग्य ती चौकशी होऊन न्यासाचा कारभार हा श्री साईबाबा संस्थान शिर्डी, सिद्धिविनायक व प्रभादेवी देवस्थान मुंबई, श्री शनी शिंगणापूर देवस्थान यांच्याप्रमाणेच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टही शासनाने ताब्यात घ्यावी. व भाविकांच्या माध्यमातून येणाऱ्या देणगी व शासनाच्या विविध योजनेतून भाविकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी श्री. बेनके यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यात गडावर स्वतंत्र पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, पार्किंग व्यवस्था, प्रसाधनगृह, अग्निशमक यंत्रना, उद्यान- बगीचे तयार करण्याची मागणी करण्यात आले आहे.

Web Title: Demand for bringing Mr. Saptashringi Niwasini Devi Trust under the government