जळगाव - शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

जळगाव : स्वामिनाथन आयोगात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा म्हणजे दीडपट हमीभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, दुधाला पन्नास रुपये लिटरचा भाव द्यावा, संपूर्ण वीजबिले माफ करावे यासह विविध मागण्यासाठी आज शेतकरी सुकाणू समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले.

वरील मागण्यांची पूर्तता न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा समितीने दिला आहे. वरील मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले. 
सुकाणू समितीचे सचिन धांडे, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, कल्पिता पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार, अतुल चौधरी, सुधाकर पाटील, खुशाल चव्हाण, वासुदेव पवार, किरण वाघ, दिलीप सपकाळे, आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच दरम्यान अन्नत्याग आंदोलन झाले. 

Web Title: For demand of farmers starts agitation