नाशिक - उन्हामुळे तरुणाईकडून गॉगल्सला मागणी 

रोशन भामरे
शुक्रवार, 18 मे 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : गेल्या दोन महिन्यापासून सर्वत्र उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उष्णतेत डोळ्यांच्या संरक्षणासाठी नागरिक गॉगल्सची खरेदी करताना दिसत असून उन्हाची तीव्रता वाढल्याने तालुक्यात व्यावसायिकांनी ग्रामीण भागातील बाजार तसेच मोठ्या रस्त्याच्या कडेला चष्मा व गॉगल विक्रीसाठी दुकाने थाटलेली दिसत असून त्यात गॉगल खरेदीसाठी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना दिसून येत आहे. 

मागील महिन्यापासून जिल्हाभरात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून, त्यापासून बचाव होण्यासाठी नागरिक संरक्षणासाठी विविध साहित्याचा वापर करताना दिसून येत आहेत. यामध्ये डोक्याला रुमाल, डोळ्यासाठी गॉगल, अंगामध्ये सुती कपड्यांचा वापर करीत आहेत. उन्हात काम करणारे व वाढत्या उन्हापासून संरक्षणासाठी सध्या बाजारात आलेले गॉगल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील बाजारात तसेच रस्त्याच्या कडेला विक्री केले जाणारे गॉगल 50 रुपयांपासून ते 200 रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. भर उन्हामध्ये गेल्यावरही डोळ्याला थंडावा मिळणाऱ्या गॉगला विशेष मागणी आहे. या गॉगलची वाढलेली मागणी पाहून विक्रेत्यांनीही ते विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. सदर गॉगल हे शंभर रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत आहेत. दरम्यान दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गॉगलच्या मागणीत देखील वाढ होत आहे.

उन्हापासून बचावासाठी आपण विविध साहित्यांचा वापर करीत असतो. गॉगल त्यामुळे गॉगल खरेदी करताना आपल्या चेहऱ्याचा आकाराप्रमाणेच तो घ्यावा, तर उन्हात गॉगल्स लावून निघणे फॅशन नसून आवश्यकता असल्याचेही लक्षात घेणे गरजेचे आहे; परंतु फॅशनेबल गॉगल्सने व्यक्तीमत्वात भर पडते. जर आपणही गॉगल्स घ्यायला जात असाल किंवा स्टायलिश दिसण्याची इच्छा असेल तर वेगळ्या पद्धतीचा गॉगलची निवड केली जात आहे.

उन्हाळ्यात डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल खरेदी करताना आवश्यक ती काळजी घेतल्यास डोळ्यानाही फायदेशीर असते. तसेच दिसायलाही वेगळा लुक मिळू शकतो. त्यामुळे गॉगल खरेदी करताना आपल्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणेच गॉगल निवडावा,असा सल्ला तज्ञाकडून दिला जात असतो.

“उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोळ्यांना गाँगल्स लावणे महत्वाचे आहे.वाढत्या उष्णतेमुळे डोळे कोरडे पडतात,यास गाँगल्स फायदेशीर ठरतो. व डोळ्यांची उन्हापासून निघा ही राखली जाते.”
-  दीपक सोनवणे, संचालक दीपक चष्माघर, सटाणा

Web Title: demand for goggle from youth for summer