शहरातील चोरीचा तपास व चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

शिंदखेडा- शहरात काही महिन्यापासून चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, दुकान फोडी, घर फोडी, मोटारसायकल चोरीसह घरातील विद्युत मोटारीच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. या भुरट्या चोरांवर पोलिस यंत्रणेचा वचक बसावा तसेच झालेल्या चोरीचा शोध लवकरात लवकर लागावा अशी मागणी शिंदखेडा व्यापारी संघटना व प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतिष गोराडे यांना देण्याचे आले. 

शिंदखेडा शहर परिसरात वाढलेल्या चोरीचे प्रमाण यामुळे व्यापारी वर्ग व नागरिक भयभीत आहे. गेल्या महिन्यातच वर्दळीच्या स्टेशन रोड वरील बसस्थानक परिसरात काही अंतरावर असलेल्या राज इलेक्ट्रॉनिक, रूपा बूट हाऊस, हर्षल ऑइल या दुकानात चोरट्यानी दुकानातील मुद्देमाल लंपास करून लाखो रुपये चोरले. येथील रहिवासी वस्तित मोटार सायकल व विद्युत मोटार चोरण्याचा घटना घडल्या तसेच येथील लक्ष्मी नारायण कॉलनीत भाजपचे शहर उपाध्यक्ष  यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कते मुळे फसला. या सर्व घटनेचा पोलिस तपास शून्य असल्याने व्यापारीवर्ग व  नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पोलिस यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास राहिला नसल्याची भावना शहरात व्यक्त होऊ लागली आहे. या साऱ्या घटनेचा निषेध व्यक्त करत येथील संतप्त व्यापारी व नागरिकांनी पोलिस स्टेशन गाठून शहरातील चोरीचा लवकरात लवकर तपास लावून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे तसेच प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Demand for have control the theft and thieves in the city