मधाची मागणी वाढली... हिवाळ्यात मधाचे फायदे वाचून थक्क व्हाल...

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

मध गोड असतेच, पण आरोग्याच्या दृष्टीने त्याचे खूप फायदे आहेत. शहरासह ग्रामीण भागातील जनता उत्तम आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात मधाचा वापर करताना दिसतात.बाजारात विविध कंपन्यांचे बाटलीबंद मध विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रानावनात जाऊन मध गोळा करणाऱ्या लोकांनी जमा केलेल्या मधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

नाशिक : मध गोड असतेच, पण आरोग्याच्या दृष्टीने त्याचे खूप फायदे आहेत. शहरासह ग्रामीण भागातील जनता उत्तम आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात मधाचा वापर करताना दिसतात. गाव व परिसरात मधमाश्‍यांचे पोळं उतरवून त्यातील मध काढून विक्री करणारे झारखंडमधील विक्रेते दाखल झाले आहेत. येथील उंच इमारती, झाडांवरील भवर मधाचे पोळं अतिशय कौशल्याने राणीमाशीला जेरबंद करून मध काढून त्याची विक्री करतात. प्रतिकिलो तीनशे रुपये दराने विक्री होते. बाजारात विविध कंपन्यांचे बाटलीबंद मध विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रानावनात जाऊन मध गोळा करणाऱ्या लोकांनी जमा केलेल्या मधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. 

हेही वाचा >थरारक अपघात....गाडीत होते खेळाडू....दीड तास गाडीच्या कॅबिनमध्ये 'तो' अडकून होता

हिवाळ्यात मधाचे फायदे..
लढ्ढपणा, वाढते वजन या समस्यांच्या मुक्ततेसाठी दररोज कोमट पाण्यात मध टाकून पिण्याने फायदा होतात. मधपाणी पिण्याचे प्रमाण वाढत आहे. हिवाळ्यात आरोग्यसंवर्धनासाठी पहाटेपासूनच व्यायामासह आहाराकडे विशेष लक्ष देण्याकडे कल असतो. आयुर्वेद चिकित्सा व आहारशास्त्रात मधाचे अनेक फायदे दर्शविले आहेत. मधात व्हिटॅमिन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्ल्याने शरीरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कफ व दम्यासाठी मध रामबाण उपाय आहे. आल्यासह मध घेतल्यास खोकल्याला आराम मिळतो. उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅडप्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरत असल्याने नागरिकांत हिवाळ्यात मधाची खरेदी होत असल्याने जंगलात व इमारतीवर असलेल्या मधाच्या पोळ्यामधील मध काढून विक्री करणारे परिसरात भटकंती करताना जागोजागी दिसत आहेत. जुने व मोठे मधाचे पोळं काढण्यात ही मंडळी तरबेज आहेत. बहुसंख्य ठिकाणी ज्याच्या इमारती, घराजवळ पोळं आहे ती व्यक्ती हे मध खरेदी करते. दर्जेदार मध मिळत असल्याने अनेक जण त्याला पसंती देतात.  

Image may contain: one or more people and outdoor
Photo : झारखंड राज्यातील मध विक्रेता व मध खरेदीसाठी असलेले ग्राहक

हेही वाचा >जिल्हा न्यायालयात आगीत शेकडो फाइल खाक..कोणत्या होत्या त्या फाईल? 

मध गोळा करणाऱ्यांना सुगीचे दिवस  

गाव व परिसरात मधमाश्‍यांचे पोळं उतरवून त्यातील मध काढून विक्री करणारे झारखंडमधील विक्रेते दाखल झाले आहेत. येथील उंच इमारती, झाडांवरील भवर मधाचे पोळं अतिशय कौशल्याने राणीमाशीला जेरबंद करून मध काढून त्याची विक्री करतात. प्रतिकिलो तीनशे रुपये दराने विक्री होते. बाजारात विविध कंपन्यांचे बाटलीबंद मध विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रानावनात जाऊन मध गोळा करणाऱ्या लोकांनी जमा केलेल्या मधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The demand for honey has increased due to benefits of honey in winter Nashik Marathi News