दोनशे घरांमध्ये आढळल्या डेंगी अळ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

नाशिक - शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढल्याने त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने स्वच्छता व जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत पश्‍चिम, सातपूर, पूर्व व नाशिक रोड विभागात राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये घरांमध्ये १९० डेंगीच्या अळ्या आढळून आल्या आहेत. प्रभाग १३, २०, ३१, ६०, १९, ६१ व नऊमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली होती. विशेष अभियानात सात हजार ३८ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात १९० घरांमध्ये डेंगी अळ्या आढळून आल्या. नऊ हजार ७२७ पाणीसाठे तपासण्यात आले. त्यात २४० ठिकाणी पाण्यामध्ये डेंगीच्या अळ्या आढळल्या आहेत.

नाशिक - शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढल्याने त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने स्वच्छता व जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत पश्‍चिम, सातपूर, पूर्व व नाशिक रोड विभागात राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये घरांमध्ये १९० डेंगीच्या अळ्या आढळून आल्या आहेत. प्रभाग १३, २०, ३१, ६०, १९, ६१ व नऊमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली होती. विशेष अभियानात सात हजार ३८ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात १९० घरांमध्ये डेंगी अळ्या आढळून आल्या. नऊ हजार ७२७ पाणीसाठे तपासण्यात आले. त्यात २४० ठिकाणी पाण्यामध्ये डेंगीच्या अळ्या आढळल्या आहेत. महापालिकेतर्फे या भागामध्ये पाच हजार पत्रके वाटण्यात आली, तर ९५ गटसभा घेण्यात आल्या. ६१ बांधकामाच्या ठिकाणी, दहा टायर दुकाने, चार भंगारीचे दुकाने व एकोणीस बेसमेंट साइटवर शोधमोहीम राबविण्यात आली.

डेंगी जनजागृतीसाठी आराखडा
शहरात दिवसेंदिवस डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोमवारी (ता. १०) महाकवी कालिदास कलामंदिरात पाचशे शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. आरोग्य विभागाचे डॉ. राहुल गायकवाड डेंगीबाबत, तर डॉ. सुनील बुकाणे स्वच्छता या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. पाचशे शिक्षकांद्वारे पंचवीस हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थी पाच घरांमध्ये प्रबोधन करतील. याप्रमाणे सव्वालाख लोकांपर्यंत डेंगी जनजागृतीबाबत प्रबोधन केले जाणार आहे.

Web Title: dengue sickness in nashik