देवळाली मतदार संघ :राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे विजयाच्या दिशेने  | Election Results 2019

saroj ahire vs.jpg
saroj ahire vs.jpg

नाशिक : देवळाली मतदार संघात सत्ताधारी शिवसेनेला 30 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून आव्हान मिळाले आठव्या फेरी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरोज आहिरे 39926 मत मिळवून शिवसेनेचे योगेश घोलप यांच्या पेक्षा 20782 मतांनी आघाडीवर आहेत.अडीच वषापूर्वी महापालिका निवडणूकीत भाजपतफेरी निवडणूक लढवितांना शिवसेनेच्या माजी महापौर नयना घोलप यांना पराभवाचा झटका दिल्यानंतर आज विधानसभा निवडणूकीत त्यांचे बंधू व विद्यमान आमदार योगेश घोलप यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवितांना पराभवाचा झटका देण्याची सरोज आहिरे यांची वाटचाल सुरु आहे.

तब्बल 30 वषार्नंतर शिवसेनेच्या गडाला राष्ट्रवादीकडून सुरुंग 

पहिल्या फेरीत अहिरे यांना 6544 तर घोलप यांना 2052 मते मिळाली दुसऱ्या फेरी अखेर अहिरे यांना 8460 तर घोलप यांना 3262 तिसऱ्या फेरी अखेर अहिरे 17728 तर घोलप 7128 चोथ्या फेरी अखेर सरोज अहिरे 22845 तर योगेश घोलप 9640 मत झाली त्यामुळे चौथ्या फेरी अखेर अहिरे 13205 मतांनी आघाडीवर होत्या. पाचव्या फेरी अखेर अहिरे 15609 मताने असघडीवर होत्या सहाव्या फेरी अखेर सरोज अहिरे 17956 मतांनी आघाडीवर पोहोचल्या. सातव्या फेरीत सराेज आहिरे (राष्ट्रवादी) यांना 35504 तर शिवसेनेचे याेगेश घाेलप यांना 17168 मते झाली त्यामुळे आहिरे यांची 18336 मतांची आघाडी कायम राहिली. 

नाशिक रोडला दुर्गा उद्यान लगतच्या महापालिकेच्या विभागीय कार्यालयात
निवडणूक निर्णय आधिकारी निलेश श्रींगी यांच्या अध्यतक्षतेखाली चौदा टेबलावर
मतमोजणी सुरु झाली.एकुण झालेल्या मतदानापैकी पाच टक्के मतांची व्हिव्हीपॅट चिठ्यांची मोजणी करायची असल्याने त्यासाठी सकाळी एनवेळी सरमिसळीकरण करण्यात येउन त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली. प्रत्येकी चौदा टेबलावर मतमोजणी सुरु झाली. ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रातील मतदानाचे आकडे स्पष्ट होत गेले आणि कार्यकर्त्यातील चलबिचल वाढत गेली.

उमेदवार फेरी 1, फेरी 2 फेरी 3 फेरी 4 फेरी 5 6 फेरी 7 फेरी 
सराेज आहिरे (राष्ट्रवादी) 6544 5467 5717 5117 4555 5122 2982 
याेगेश घाेलप (शिवसेना) 2052 2205 2871 2512 2151 2775 2602 
सिध्दांत मंडाले (मनसे) 158 119 74 343 242 92 482
गाैतम वाघ (वंचित आघाडी)194 211 266 545 436 701 

उमेदवार फेरी 8 फेरी 9 फेरी 10 फेरी 11 फेरी 12 फेरी 13 फेरी 
सराेज आहिरे (राष्ट्रवादी) 4422 
याेगेश घाेलप (शिवसेना) 1974 
सिध्दांत मंडाले (मनसे) 
गाैतम वाघ (वंचित आघाडी)
अमाेल पठाडे 

रस्ते बंद चोख बंदोबस्त
मतमोजणीच्या पार्श्वमीवर दुर्गा उद्यान समेरील मार्ग बंद ठेवला होता. सकाळपासून
मोठा बंदोबस्त लावला होता. काल रात्रीपासून या मार्गावरील एकेरी वाहातूक सुरु होती.
निकालाच्या उत्सुकतेमुळे सकाळपासून शिवसेना- राष्ट्रवादी कॉर्ग्रेसच्या कार्यकर्त्याची गर्दी होती. तीस वर्षात प्रथम शिवसेनेला कडवे आव्हान मिळाल्याच्या चचेने बहुचर्चित ठरलेल्या देवळाली मतदार संघातील निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सकाळी निकालाचा कौल स्पष्ट होत गेला तसतशी नाशिक रोडला दुर्गा उद्यानाच्या परिसरात कार्यकर्त्याची जल्लोष वाढत गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com