चाळीस उमेदवारांची डिपॉझिट जप्त ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जळगाव - जळगाव महापालिका 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात 303 उमेदवार रिंगणात होते. शुक्रवारी मतमोजणी प्रक्रियेतून आलेल्या निकालामध्ये 303 उमेदवारांपैकी जवळपास 40 उमेदवारांची अनामत रक्कम ही विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा ठरावीक मते न मिळाल्याने जप्त होणार आहे. 

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जासोबत अनामत रक्कम ही उमेदवारांना भरावी लागते. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी पाच हजार, ओबीसी आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडीच हजार रुपये एवढी अनामत रक्कम भरावी लागली. निवडणुकीसाठी 613 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अनामत रकमेपोटी 21 लाख 7 हजार 500 रुपये जमा झाले. निवडणुकीत विजयी उमेदवारांपेक्षा एकसष्टमांस (1/6) पेक्षा कमी मते मिळाल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करण्याबाबतचे नियम राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. 

निवडणुकीत 613 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. छाननी अंती 447 अर्ज वैध 
तर 188 अर्ज अवैध ठरलेत. त्यानंतर 427 इच्छुक उमेदवारांपैकी 124 उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यामुळे 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी 75 निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतांपेक्षा एकसष्टमांस मते हे 40 उमेदवारांना कमी मिळाले. त्यामुळे या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. तर 498 उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत दिली जाणार आहे. 

Web Title: Deposit of 40 candidates seized!