किरकोळ कारणावरून कापली जातेय आयुष्याची दोरी! 

depretion sucide
depretion sucide

जळगाव : महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे वास्तव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या "नॅशनल हेल्थ प्रोफाइल-2019'च्या माध्यमातून समोर आले आहे. विशेष म्हणजे तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. 

केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या "नॅशनल हेल्थ प्रोफाइल- 2019'मध्ये देशभरातील आत्महत्येचे गंभीर चित्र स्पष्ट केले आहे. दरम्यान, आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली, तरी नैराश्‍य हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण 
अहवालात दिलेल्या राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्रात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. यात पुरुषांची संख्या 12 हजार 654, तर चार हजार 314 महिला आहेत. यात 30 ते 45 या वयोगटात चार हजार 648 पुरुषांनी, तर 18 ते 30 वर्षे वयोगटातील तीन हजार 559 तरुणांनी आत्महत्या केली आहे. 

वयोगटानुसार आत्महत्या 

वयोगट : पुरुष महिला 
18 ते 30 3559 1831 
30 ते 45 4648 1231 

असा दूर करा तणाव 
- योग्य आहार, पुरेशी झोप व नियमित व्यायाम आवश्‍यक 
- मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान- प्राणायामाचा फायदा होतो 
- स्वतःसाठी वेळ काढा, छंद जोपासा 
- दिनचर्येचे/उपलब्ध वेळेचे नियोजन करा 
- मोबाईल, टीव्हीचा अतिवापर टाळा 
- व्यसनांपासून दूर राहा 
- कुटुंब, सहकाऱ्यांशी सतत संवाद ठेवा 

 
नैराश्‍यात असलेल्या रुग्णांमध्ये आत्महत्या करण्याची लक्षणे जास्त असतात. याव्यतिरिक्त दारूचे सेवन आणि इतर सामाजिक समस्यांमुळेही आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढते आहे. विशेष म्हणजे 15 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये आत्महत्येचे विचार तुलनेने अधिक येत असतात. त्यांना समुपदेशन तसेच तीव्र स्वरूपातील मानसोपचाराची गरज भासते. 
- डॉ. विजयश्री मुठे, मानसोपचारतज्ज्ञ, जळगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com