अनौपचारिक संस्कृत शिक्षणासाठी  देशात दीडशे शिक्षकांची नियुक्ती 

अनौपचारिक संस्कृत शिक्षणासाठी  देशात दीडशे शिक्षकांची नियुक्ती 

अनौपचारिक संस्कृत शिक्षणासाठी 
देशात दीडशे शिक्षकांची नियुक्ती 

भुसावळ : देशभरातील अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्रात दीडशे संस्कृत शिक्षकांची स्वतंत्रपणे नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय संस्कृत संस्थान, नवी दिल्ली यांच्यातर्फे ही केंद्रे चालवली जातात. 
सर्वसामान्यांमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा त्यांना संस्कृत शिकण्याची संधी मिळावी म्हणून ही संस्कृत शिक्षण केंद्रे चालविली जातात. 
आतापर्यंत या केंद्रात शाळेतील संस्कृत शिक्षकच आपला वेळ अध्यापनासाठी देत होते. नव्या धोरणानुसार या केंद्रात आता स्वतंत्र संस्कृत शिक्षकाची नेमणूक केली आहे. यामुळे संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचे एक नवे दालन उघडले आहे. 

अशी झाली निवड 
देशभरातुन पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. त्यांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन त्यातील दोनशे जणांनी निवड केली त्यांना डेहराडून येथे 21 दिवसाचे खास प्रशिक्षण दिले. त्यानंतर पुन्हा लेखी व तोंडी परीक्षा घेऊन दीडशे जणांची अंतिम निवड केली. 

भुसावळ, नाशिकसह पाच ठिकाणी नियुक्ती 
संस्कृत भाषा शिकवण्यासाठी पाच अभ्यासक्रम तयार केले आहे. महाराष्ट्रातही ही केंद्र सुरू असून भुसावळ, नाशिक, अमरावती, नागपूर येथील केंद्रात शिक्षकांची नियुक्ती केली आहे. हे शिक्षक सध्या शहरात फिरून विविध संस्था धार्मिक व सामाजिक मंडळे यांची भेट घेऊन त्यांना अनौपचारिक वर्गाबद्दल माहिती देतात. तसेच स्थानिक संस्कृत शिक्षकांच्या संपर्कात राहून आपला जनसंपर्क वाढवत आहेत. 
भुसावळला श्री संत ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेत मुख्य केंद्र म्हणून मान्यता मिळाली असून श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात उपकेंद्र सुरू होणार आहे. यासाठी गुजरातमधील व्रजेश प्रदीपभाई पंडित यांची नियुक्ती केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com