PHOTO : आई-वडिलच ते शेवटी...कुंभार असून मुलीच्या 'या' स्वप्नाचा विचार त्यांच्या डोक्यात..अखेर...

बापूसाहेब वाघ : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

कुंभारकाम सांभाळून वडील संतोष रसाळ व आई रत्ना रसाळ यांनी गायत्रीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करता जुन्या सायकलवर सराव करण्यास येत असलेले अडथळे त्यांच्या निदर्शनास आले. गायत्रीनेही अतिशय खडतर सराव करून यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला.

नाशिक : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालयातर्फे झालेल्या शालेय राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत पिंपळगाव लेप येथील पाटोदा विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री रसाळ हिने सहावा क्रमांक मिळवला.

Image may contain: 1 person, riding a bicycle, bicycle and outdoor

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

कुंभारकाम करुनही आई-वडिलांनी मुलीसाठी जमवले पैसे

पिंपळगाव लेप येथे कुंभारकाम सांभाळून वडील संतोष रसाळ व आई रत्ना रसाळ यांनी गायत्रीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करता जुन्या सायकलवर सराव करण्यास येत असलेले अडथळे लक्षात घेऊन सरावासाठी अत्याधुनिक 26 हजारांची सायकल तिला उपलब्ध करून दिली. तसेच पिंपळगाव लेप ते येवला असा अतिशय खडतर सराव करून गायत्रीनेही यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. या यशात तिला दत्तू रसाळ, रामकृष्ण रसाळ, आजोबा कारभारी रसाळ यांनीही सहकार्य केले. 

हेही वाचा > मुथूट फायनान्सच्या दरोड्यातील 'त्याला' बिहारमधून उचलणार

राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत पिंपळगाव लेपच्या गायत्रीचे यश 
आपल्या शाळेतील माजी विद्यार्थिनी सायकलिंगसाठी राज्यस्तरावर गेल्याचा आनंद व्यक्त करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला मेतकर व सर्व शिक्षकांनी गायत्रीचा सत्कार केला. प्राचार्य एन. ए. दाभाडे, पर्यवेक्षक पाटील, मार्गदर्शक प्रशिक्षक संजय पाटील, कैलास गाजरे, सरपंच माणिकराव रसाळ, मधुकर साळवे, मधुकर ढोकळे, दीपक ढोकळे, आतिष दुनबळे, किरण बुवा, सुनील थोरात, संतोष गायकवाड व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 

Image may contain: 1 person

PHOTO : एक नाही..दोन नाही..तर कित्येक महिलांचा नाथ "लखोबा लोखंडे"...अखेर झाला जेरबंद...

प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला प्रोत्साहन देणे गरजेचे

प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. गायत्रीने आमच्या गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले. पुढील काळातही तिला शिक्षणासाठी व विविध खेळांत सहभागाची संधी प्राप्त करून देऊ. तिला मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व आभार. - संतोष रसाळ, पिंपळगाव लेप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite financial circumstances Parents bought a bicycle for a girl to succeed in cycling Nashik Marathi News