वर्षानुवर्षे दुष्काळ सोसणाऱ्या येवल्याचे नाव दुष्काळी यादीतून बेपत्ता

farmers
farmers

येवला - अवघा ६० टक्के पाऊस, शेतातील करपलेली उभी पिके, पन्नासवर गावात सुरु असलेले पाणीटॅकर अन् भकास झालेले माळराण यापेक्षा वेगळे चित्र दुष्काळाचे असते का..? खरे तर येवलेकर दुष्काळ अंगाखांद्यावर खेळवत दरवर्षी त्याला पोसतात मात्र दुष्काळाच्या यादीत याच तालुक्याचे नाव नसल्याचे आश्चर्य सरकारी यंत्रणेने पुढे आणले आहे. जिल्ह्याच्या डार्क वॉटर शेड गणल्या जाणाऱ्या दुष्काळी तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे.

तालुक्याचा अवर्षणप्रवण पूर्व भाग दरवर्षी तर अख्ख्या तालुका दोन वर्षाआड सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होऊन दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतो.यंदा तर भाजलेले रान अन करपलेले शेत पाहताना मन हळवे होऊन जात अशी स्थिती आहे. भर पावसाळ्यात तालुक्यात टॅकरने पाणीपुरवठा सुरु असून आजही १५ टॅकरने २३ गावे व १९ वाड्यांना पाणीपुरवले जातेय. मात्र, शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांजची यादी जाहीर केली आहे. विशेषत: या यादीत बागायतदार तालुके समाविष्ट झाले, तर भयानक दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या येवल्याला मात्र या यादीतून वगळण्यात आल्याने चिता वाढत असून संताप व्यक्त होत आहे.

प्रशासनाला तालुक्यासत एवढी हिरवळ कोठे दिसली?, अधिकारी झोपेत आहेत का,त्यांना दुष्काळ दिसत नाही असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.पावसाळ्यात व आजही गावोगावचे लहान पाझर तलाव कोरडे पडले आहेत. अनेक गावांत लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत,असे असतानाही तालुक्यारला नेमके दुष्काळग्रस्त यादीतून कसे वगळले गेले असा प्रश्न जनतेला पडला आहे. तर तालुक्यालची पीक पाणी, आणेवारी आदी माहिती संकलित करताना लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी यांना प्रशासनाने विचारात घेतले नसल्याची भावना निर्माण झाली आहे.

नेते-पुढारी शांत-शांत
एवढे रामायण होऊनही अद्याप ना आंदोलन झाले ना कोणी जाब विचारला.आमदार छगन भुजबळ व आमदार नरेद्र दराडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.पण जोरदार पाठपुरावा करण्याची गरज आहे.बाकी शेतकरी नेते,पुढारी सगळे शांतच असून भाजपाचे नेतेगणही यावर बोलायला तयार नाही.हा राष्टवादीचा बालेकिल्ला म्हणून नाव वगळले का..असा संतप्त सवालही केला जाऊ लागला आहे.

या निकषाने होतेय दुष्काळी निवड 
- चार आठवडे पावसाचा खंड
- रिमोर्ट सेन्सिंग फोटोग्राफी
- भूगर्भातील पाण्याची पातळी
- खरीप हंगामातील पीक परिस्थिती

या आहेत अपेक्षा...
-गावोगावी पुरेसे पाणी मिळावे.
-जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्ना सोडवण्यासाठी छावण्या सुरु करा
-लोकांना दुष्काळी कामे मिळावीत.
-अन्नधान्याचा प्रश्नप मार्गी लागावा.
-नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करावी.
-कर्ज वसुलीला स्थगिती  

“पिकांचे कोंब पावसाअभावी मातीतच गुदमरून जळाले तेव्हापासून आम्ही अधिकार्याकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय.आठ तालुक्याची नावे यादीत येतात अन दुष्काळी तालुकाच नाही..यामागे न पटणारे काहीतरी कारण नक्कीच असावे.तालुकावासियांनी आता आवाज उठवावा नाहीतर पस्तावा करण्याची वेळ येईल.”
-भागवतराव सोनवणे,संयोजक,जलहक्क संघर्ष समिती

“ऐन खरीपात पिके व टंचाईची यापूर्वी कधी नव्हती इतकी भयानक परिस्थिती यावर्षी उद्भवली आहे.पूर्व भागात तर पिकांचे शेतात सांगाडे उभे राहिले आहेत.शासनाने प्रत्यक्ष नुकसानीची स्थितीची पाहणी करून फेरआढावा घ्यावा व तालुका दुष्काळ जाहीर करावा.तालुक्यावर अन्याय करू नये.”
मकरंद सोनवणे,संचालक,बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com