जिद्दीच्या जोरावर 'ती' बनली पोलीस ऊपनिरीक्षक 

भगवान खैरनार
बुधवार, 27 जून 2018

मोखाडा -  शालेय शिक्षण घेत असताना आईचे मायेचे छत्र हरपले. मावशीकडे राहुन शिक्षण घेतले. पदवीधर होतानाच मनी खुणगाठ बांधुन पोलीस ऊपनिरीक्षक पदाचा अभ्यास केला. आणि पहील्याच प्रयत्नात दिपाली खाडेने राज्य सेवा परिक्षेत घवघवीत यश संपादन करून, पोलीस उपनिरीक्षक पदाला वयाच्या 23व्या वर्षीच गवसणी घातली आहे. मोखाड्यातील दिपाली खाडे या आदिवासी युवतीने परिस्थिती वर मात करून, मोखाड्यात पहीली महिला पोलीस अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला आहे. 

दिपालीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. दिपाली शाळेत 8 वीला असतानाच तीची आई स्वर्गवासी झाली. त्यानंतर तीचे संगोपन तीची मावशी जयश्री आणि काका बाबु ढमके यांनी केले. मुळातच अंगी हुशारी, क्रिडा स्पर्धात अग्रेसर राहुन स्पर्धा परिक्षेची आवड असलेल्या दिपालीने दहावी पर्यंतचे शिक्षण मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत घेतले. 

पुढे बारावी पर्यंतचे शिक्षण महर्षी रामजी विठ्ठल शिंदे या आश्रमशाळेत मोखाड्यात घेतले. त्यानंतर पदवीचे शिक्षण नाशिक मधील के. टी. एच. एम. महाविध्यालयात घेतले आहे.

पदवीधर होत असतानाच, तीने राज्य सेवा परीक्षेतील पोलीस ऊपनिरीक्षक पदाचा अभ्यास सुरू केला. पदवीधर झाल्यानंतर पहील्याच प्रयत्नात दिपालीने पोलीस ऊपनिरीक्षक पदाची परिक्षा ही ऊत्तीर्ण झाली आहे. आदिवासी समाजात जन्मलेल्या, शालेय शिक्षणातच आईचे मायेचे छत्र हरपले. मात्र, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर परिस्थिती वर मात करून मोखाडा तालुक्यात पहीली महिला पोलीस अधिकारी बनण्याचा बहुमान दिपालीने पटकावला आहे. 

माझे दहावी आणि बारावी पर्यंत चे शिक्षण मोखाड्यात झाले. त्यानंतर एक वर्ष मी गॅप घेतला. पुढे मी पदवी नाशिक च्या के. टी. एच. एम. महाविध्यालयात घेतली. 2016  ला पदवीधर झाले , त्याचवेळी पोलीस ऊपनिरीक्षक पदाचा अभ्यास सुरू केला  2017   ला मी पोलीस ऊपनिरीक्षक पदाची परिक्षा दिली तीचा रिझल्ट आता लागला आहे. मला नाशिक च्या युनिवर्सल फाऊंडेशन च्या राम खैरनार सरांनी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच माझ्या यशात माझे काका - मावशी जयश्री आणि बाबू ढमके यांचा मोलाचा वाटा आहे. 
दिपाली खाडे, पोलीस उपनिरीक्षक पदाची ऊत्तीर्ण विध्याथीॅनी.
 
Web Title: With the determination she became 'Police Inspector'