video : सुट्टीत फिरायचा प्लॅन बनवताय..मग 'इथे' भेट द्यायलाच हवी

devdari yeola.jpg
devdari yeola.jpg

येवला : येवल्यापासून २८ किलोमीटर, तर येवला-नांदगाव महामार्गावरील राजापूरपासून अवघ्या आठ किलोमीटरवर देवदरी गाव आहे. आजूबाजूने चौफेर जंगल, मध्येच बागडणारी हरणे, तर खोल दरीत पडणारे पाणी, तेथील मंदिरे अशा मनमोहक वातावरणामुळे आजूबाजूच्याच नव्हे, तर तालुक्‍यातील नागरिकांच्या पसंतीस हे स्थळ उतरले आहे.

पर्यटनाचा मनसोक्त आनंद
 येवल्यापासून २८ किलोमीटर, तर येवला-नांदगाव महामार्गावरील राजापूरपासून अवघ्या आठ किलोमीटरवर देवदरी गाव आहे. आजूबाजूने चौफेर जंगल, मध्येच बागडणारी हरणे, तर खोल दरीत पडणारे पाणी, तेथील मंदिरे अशा मनमोहक वातावरणामुळे आजूबाजूच्याच नव्हे, तर तालुक्‍यातील नागरिकांच्या पसंतीस हे स्थळ उतरले आहे. येवल्यातूनही अनेक कुटुंबे सुटीच्या दिवशी देवदरीला येऊन पर्यटनाचा आनंद लुटतात. गावापासून जवळच असलेल्या खोल दरीत सिद्धेश्‍वर व विघ्नेश्‍वर मंदिर असून, शेजारीच दरी व त्यात पाणी कोसळणारे दृश्‍य धबधब्याचा आनंद देते. 

विशेषतः सुटीच्या दिवशी गर्दी ठरलेली....
राजापूरच्या गावालगत जंगलात वडपाटी पाझर तलाव असून, दुरुस्तीमुळे यंदा तो तुडुंब भरला आहे. येथे महादेव मंदिर असून, गोदावरीच्या पाण्याचा मंदिराखालून उगम आहे. १२ महिने येथे पाणी सुरू असते. अनेक भाविकांचे स्थळ श्रद्धेचे ठिकाण बनत असून, आजूबाजूचा परिसर मोहक असल्याने आता पर्यटकांना भुरळ पडू लागली आहे.दरीत उतरण्यासाठी भव्य पायऱ्या, सुंदर मंदिरे विकसित केली आहेत. यामुळे पर्यटकांची संख्या वाढत असून, शाळा, कॉलेजसाठी हे ठिकाण सहलीचे उत्तम स्थळ बनले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com