वाकद येथील महिलेचा कालव्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

देवगाव (नाशिक) - नांदूरमध्यमेश्‍वर जलद कालव्यात धुणे धुण्यासाठी गेलेल्या वाकद येथील शकुंतला साहेबराव गायकवाड (वय 50) या महिलेचा तोल गेल्याने गुरुवारी (ता. 8) बुडून मृत्यू झाला. गायकवाड यांचा मृतदेह 16 तासांनंतर शुक्रवारी (ता. 9) पहाटे पाच वाजता सत्यगाव शिवारात सापडला. गायकवाड गुरुवारी दुपारी बारा वाजता गोदावरी जलद कालव्यात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र बराच वेळ झाला तरी त्या घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता धुणे दिसले. मात्र त्या न दिसल्याने त्या बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. कालव्याचा विसर्ग 750 क्‍युसेक असल्याने मदतकार्यात अडथळे आले. कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, पी. आर. शिरसाठ यांच्या निर्देशाने दुपारी सव्वातीनला जलद कालव्याचे दार बंद करण्यात आले. दरम्यान, ग्रामस्थांनी गायकवाड यांचा रात्रभर शोध घेतला. कालव्याचे पाणी बंद होताच शुक्रवारी पहाटे सत्यगाव शिवारात पाइपला अडकलेल्या अवस्थेत गायकवाड यांचा मृतदेह आढळला.
Web Title: devgav news nashik news women drown death canal

टॅग्स