पिंगळेंच्या जामिनाला कर्मचाऱ्यांची हरकत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या जामीन अर्जावर उद्या (ता. 28) सुनावणी होईल. अपहाराच्या आरोपावरून ते सध्या मध्यवर्ती कारागृहात आहेत; मात्र आता नऊ कर्मचाऱ्यांकडून न्यायालयात या जामिनाला विरोध करण्याचा अर्ज दिल्याने या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्‍यता आहे.

बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्याच्या 57 लाख 73 हजार 800 रुपयांच्या रकमेसह 25 ऑक्‍टोबरला तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर रविवारी (ता. 25) न्यायालयाने एलसीबीला कोठडी नाकारून दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. काल याविषयी जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणीत उद्या (ता. 28) "एलसीबी'ने म्हणने सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिला.

Web Title: deviad pingle bell