देविदास पिंगळे रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना शनिवारी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर करण्यात आलेला "ईसीजी'चा अहवाल सामान्य आल्यानंतरही पिंगळे यांना दाखल करून घेण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे सुमारे 57 लाख रुपये लाटण्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईप्रकरणी पिंगळे न्यायालयीन कोठडीत आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथील सुनावणी येत्या 24 रोजी होणार आहे.

दरम्यान, नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पिंगळे यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानुसार त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दुपारी साडेबाराला आणण्यात आले. जिल्हा रुग्णालयात पिंगळे यांची ईसीजी तपासणी करण्यात आली; परंतु अहवाल सामान्य आला. त्यानंतरही त्यांना रुग्णालयाच्या तत्काळ विभागात दाखल करण्यात आले असून, पुन्हा ईसीजी तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना मधुमेह असल्याने रक्‍ताच्याही तपासण्या करण्यासाठी नमुने घेण्यात आले.

पिंगळे यांचा ईसीजी अहवाल सामान्य आहे. कार्डिओलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली काही तास ठेवण्यात आले आहे. पुन्हा ईसीजी अहवाल सामान्य आल्यास त्यांना मध्यवर्ती कारागृहात रवाना केले जाईल.
-डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: devidas pingale in hospital