देवळा रोटरी क्लबच्या वतीने देवळा पोलिस स्थानकास बाके भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

खामखेडा (नाशिक) : पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी चोवीस तास कामावर असतात. या कर्मचाऱ्यांना क्षणभर विश्रांती मिळावी यासाठी देवळा रोटरी क्लबच्या वतीने पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सिमेंट काँक्रीटच्या पोलीस स्थानकास दोन बाके भेट देण्यात आली आहेत.

या बाकांचे नुकतेच पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील रोटरी क्लबचे माजी उपप्रांतपाल डॉ वसंत आहेर, अध्यक्ष कौतिक पवार, सेक्रेटरी प्रितेश ठक्कर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

देवळा रोटरीच्या वतीने यावेळी पोलीस स्थानकाच्या आवारात पाच केशर आंब्यांचे रोटरी सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी अध्यक्ष कौतिक पवार यांच्या हस्ते या वृक्षांना जाळी देण्यात आल्या.

रोटरी क्लबने सामाजिक भावनेतुन केलेली मदत व पोलीस स्थानकात केलेल्या वृक्षारोपणा मुळे पोलीस स्थानकाचे शुशोभीकरन झाले असुन ह्या भेटीबद्दल रोटरी क्लबचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी आभार मानले.

यावेळी देवळा रोटरीचे सद्ष्य माजी अध्यक्ष अरुण पवार,सतिश बच्छाव,सुनिल देवरे,माणिक सोनजे,डॉ क्षितीज पाटील,राकेश शिंदे ,विलास सोनजे,खंडू मोरे व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: dewala rotary club gifts benches to dewala police station