सातपुड्यातील धरणे  25 टक्के गाळाने भरले 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

सातपुड्यातील धरणे 
25 टक्के गाळाने भरले 

रावेर : हतनूर पाठोपाठ रावेर- यावल तालुक्‍यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक प्रकल्पांत किमान पंचवीस टक्के गाळ साचला आहे. या प्रकल्पांत पूर्ण क्षमतेने पाणी संचय होण्यासाठी गाळमुक्त धरणाच्या संकल्पनेसाठी शासन दुर्लक्ष करत असल्याने लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे. 

सातपुड्यातील धरणे 
25 टक्के गाळाने भरले 

रावेर : हतनूर पाठोपाठ रावेर- यावल तालुक्‍यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक प्रकल्पांत किमान पंचवीस टक्के गाळ साचला आहे. या प्रकल्पांत पूर्ण क्षमतेने पाणी संचय होण्यासाठी गाळमुक्त धरणाच्या संकल्पनेसाठी शासन दुर्लक्ष करत असल्याने लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे. 

रावेर- यावल तालुक्‍याच्या उत्तर दिशेला असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आणि कुशीत लहान- मोठे 16 प्रकल्प आहेत. ज्येष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष (कै.) मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीतून हे प्रकल्प उभे राहिले आणि हा भाग सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाला. या साठलेल्या आणि जमिनीत जिरलेल्या पाण्याच्या भरवशावर येथील केळी बागा फुलल्या. आता किमान 25 वर्षांनंतर हे सर्व प्रकल्प गाळात रूतले आहेत. या प्रकल्पांमध्ये सध्या किमान 25 टक्के गाळ असल्याचे सांगितले जात आहे. त्यातल्या त्यात सुकी आणि अभोरा प्रकल्पात तुलनेने कमी गाळ अपेक्षित आहे कारण या नद्या खडकाळ भागातून वाहत येतात. सातपुड्यातील मंगरूळ, मात्राण, लोहारा, गंगापुरी, सूर (वड्री), मोर, काळाडोह (सांगवी) आदी प्रकल्पांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. 

लोकचळवळ हवी 
हे प्रकल्प जनतेच्या हितासाठी उभे राहिले आहेत. त्यात जितके जास्त पाणी साठेल तितका जनतेचा फायदा आहे. शासनाने गाळमुक्त धरण योजनेत प्रकल्पातील गाळ विनामूल्य नेण्यास परवानगी दिली आहे. पण सुकी प्रकल्प वनक्षेत्रात येत असल्याने त्यातील गाळ नेता येत नाही. शासनाने या सर्वच प्रकल्पातील गाळ नेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, सुकी प्रकल्पातील गाळही नेण्यासाठी परवानगी द्यावी, लोकप्रतिनिधींनी यासाठी लोक चळवळ उभारावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

प्रकल्पांच्या पाणी साठ्याची क्षमता अशी 
सुकी- 50.16 दशलक्ष घनमीटर 
अभोरा-7.44 दशलक्ष घनमीटर 
मंगरूळ-8.98 दशलक्ष घनमीटर 
गंगापुरी-2.39 दशलक्ष घनमीटर 
सूर (वड्री) 89.91 दशलक्ष घनमीटर 
काळाडोह (सांगवी) 52.77 दशलक्ष घनमीटर 
मात्राण 122.25 दशलक्ष घनफूट 
लोहारा 64.45 दशलक्ष घनफूट 
मोर (उपलब्ध नाही). 
 

Web Title: dharne