गुंड प्रवृत्तींना ठेचून काढा - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

आमळी - राईनपाड्यातील (ता. साक्री) पाच जणांच्या क्रूर हत्याकांड प्रकरणी जेही आरोपी असतील त्यांचा लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करा. गुंड प्रवृत्तींना ठेचून काढा. यात निरपराधांवर कारवाई होणार नाही याची काळजी घ्या, असा सक्त आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला. त्यांनीही क्रूर हत्याकांडाविषयी चीड व्यक्त केली.  

आमळी - राईनपाड्यातील (ता. साक्री) पाच जणांच्या क्रूर हत्याकांड प्रकरणी जेही आरोपी असतील त्यांचा लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करा. गुंड प्रवृत्तींना ठेचून काढा. यात निरपराधांवर कारवाई होणार नाही याची काळजी घ्या, असा सक्त आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला. त्यांनीही क्रूर हत्याकांडाविषयी चीड व्यक्त केली.  

मंत्री केसरकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज रात्री आठला राईनपाडा येथे भेट दिली. आमदार डी. एस. अहिरे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, ‘एलसीबी’चे निरीक्षक हेमंत पाटील, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले यांच्यासह अन्य अधिकारी, युतीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

दीड तास राईनपाड्यात
मंत्री केसरकर यांनी राईनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात हत्याकांडासह पाच मृतांविषयी माहिती घेतली. मान्यवरांसह ते अर्धा तास थांबून होते. ग्रामस्थ सखाराम पवार व विश्‍वास गांगुर्डे यांनी घटनेविषयी माहिती दिली. नंतर मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळासह परिसराची पाहणी केली. मंत्रीद्वयी दीड तास राईनपाड्यात तळ ठोकून होते. आमदार अहिरे यांनी मंत्री केसरकर यांच्याकडे पोलिसांच्या धरपकड सत्रात निरपराध्यांवर कारवाई होणार नाही, यादृष्टीने काळजी घेण्याविषयी मागणी केली. ज्यांचा घटनेशी संबंध नसेल त्यांना सोडण्याची मागणी केली. या संदर्भात उद्या (ता. ३) दुपारी राईनपाडा येथे घटनास्थळी प्रांताधिकारी गणेश मिसाळ, पोलिस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, आमदार डी. एस. अहिरे यांची बैठक होणार आहे. राईनपाडा येथे सखाराम पवार व विश्‍वास गांगुर्डे यांचेच कुटुंब मुक्कामी आहे. 

सोशल मीडिया प्रकरणी कारवाई
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, की सोशल मीडियावर अफवा किंवा अनुचित प्रकारांविषयी माहिती पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पवित्रा सरकारने घेतला आहे. यादृष्टीने सोशल मीडियावर नजर ठेवली जात आहे. राईनपाड्यातील हत्याकांडानंतर संबंधित समाजाच्या प्रतिनिधींसह पीडित कुटुंबीयांनी शांतता राखून, सरकार व प्रशासनाला सहकार्य केल्याने त्यांचे आभार मानणे कर्तव्य समजतो. त्यांच्या समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून न्याय देण्याचा, पीडित कुटुंबीयांच्या मागण्या पूर्ण करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला जाईल. मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक भूमिकेतून पीडित कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे.

Web Title: dhule aamli rainpada hatyakand police deepak kesarkar