धुळ्यात नऊ वर्षांनी होणार सैन्यभरती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

धुळे - औरंगाबादच्या आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसतर्फे 23 एप्रिल ते 10 मे या कालावधीत येथे सैन्यभरती होत आहे. सुमारे नऊ वर्षांनी होणाऱ्या नियोजित सैन्यभरती मेळाव्याच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्‍यक ते सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले. 

सैन्यभरती मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आर्मी रिक्रुटमेंट कार्यालयाचे कर्नल मोहनपाल सिंह, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह तहसीलदार व अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाले, की देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ सैनिकी अधिकारी व जवानांची उज्ज्वल परंपरा आपल्या जिल्ह्यास लाभली आहे. अशा जवानांसाठी जिल्ह्यात सैन्यभरती मेळावा होत असून, संरक्षण दलातील प्रतिष्ठेची, शिस्तप्रिय व सन्मान मिळवून देणाऱ्या नोकरीची सैन्यभरती मेळाव्याच्या माध्यमातून संधी उपलब्ध होत आहे. 

कर्नल मोहनपालसिंह यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले, आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसअंतर्गत 9 जिल्ह्यांचा समावेश होतो. या मोहिमेतून उत्कृष्ट उमेदवारांची निवड करण्यात येते. सैन्यभरती मेळावा निश्‍चित झाल्यानंतर 23 एप्रिल 2017 पासून 125 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक धुळे शहरात दाखल होईल. या मेळाव्यासाठी रोज साडेतीन ते चार हजार उमेदवार येतील, असा अंदाज आहे. 

सैन्यभरती मेळाव्याचे नियोजन निश्‍चित झाल्यावर 400 मीटर ट्रॅक असलेले मैदान, मार्शलिंग एरिया, वेगवेगळ्या विभागांसाठी शामियाने, वैद्यकीय पथके, अग्निशामक बंब, पोलिस बंदोबस्त, बॅरिकेटिंग, वाहतूक नियंत्रण, विजेचे फ्लड लाइट, 2 जनरेटर, मोबाईल टॉयलेट, पाणीपुरवठा, ऍम्ब्युलन्स, इंटरनेट सेवा, संगणक संच, एसटी बससेवा, भोजन व्यवस्थेची आवश्‍यकता भासेल, असेही कर्नल मोहनपाल सिंह यांनी सांगितले. 

Web Title: Dhule army will recruit nine years