हीना गावितांना लक्ष केलेले नाही; समाजात तेढ नको

निखिल सूर्यवंशी
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

धुळे ः लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित या आमच्या भगिनी आहेत. त्यांना निवडून आणण्यात मराठा समाजाचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना लक्ष करून किंवा पूर्वनियोजित कट म्हणून त्यांच्यावर हल्ला केल्याचा खासदार गावितांनी केलेला आरोप चुकीचा आहे. मराठा व आदिवासी समाजात तेढ निर्माण होऊ नये, तसा प्रयत्न कुणी करू नये. अन्यथा, तो हाणून पाडू, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या धुळे जिल्हा शाखेने आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत मांडली.

धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

धुळे ः लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित या आमच्या भगिनी आहेत. त्यांना निवडून आणण्यात मराठा समाजाचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना लक्ष करून किंवा पूर्वनियोजित कट म्हणून त्यांच्यावर हल्ला केल्याचा खासदार गावितांनी केलेला आरोप चुकीचा आहे. मराठा व आदिवासी समाजात तेढ निर्माण होऊ नये, तसा प्रयत्न कुणी करू नये. अन्यथा, तो हाणून पाडू, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या धुळे जिल्हा शाखेने आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत मांडली.

आरक्षणप्रश्‍नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या धुळे जिल्हा शाखेच्या आंदोलनाचा आज 17 वा दिवस आहे. रविवारी सहकुटुंब तीन हजार आंदोलक आंदोलन करतील, असे मराठा मोर्चाने पूर्वीच जाहीर केले होते. अशात प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ठेवली. त्यात लवकर बाहेर पडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून खासदार गावित या कारने जाऊ लागल्या. त्यांच्यासह बैठकीसाठी उपस्थित पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, इतर आमदार, राजकीय पदाधिकाऱ्यांचे आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे एक प्रवेशव्दार बंद करून काही काळ कोंडून ठेवावे, असे आंदोलनाचे नियोजन होते. दुसऱ्या प्रवेशव्दाराजवळ आंदोलक ठाण मांडून होते.

डॉ. गावित असल्याबाबत अनभिज्ञ
दुपारी अडीचला एक कार दुसऱ्या प्रवेशव्दारातून जात असल्याचे दिसल्यावर काही आंदोलकांनी ते प्रवेशव्दार लावण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी पोलिसांच्या ताफ्याने प्रवेशव्दार उघडण्यासाठी ताकद लावली. मात्र, आंदोलक मोठ्या संख्येने असल्याने प्रवेशव्दार उघडले. या अवसानात पळणारे काही आंदोलक थेट कारच्या टपावर चढले. त्यात वजनामुळे कारचा दर्शनीय काच फुटला. कारमध्ये खासदार डॉ. हीना गावित असल्याचे कुणालाही माहीत नव्हते.

घडलेल्या प्रकाराबाबत खेद
अतिउत्साहात काही आंदोलकांकडून हा प्रकार घडला. तो घडायला नको होता. झालेला प्रकार निंदनीय, निषेधार्ह आहे. यात कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्याविषयी खेद आणि दिलगिरी व्यक्त करतो. खासदार गावित यांच्या कारपुढे आंदोलक हेमा हेमाडे झोपून होत्या. त्यांच्या अंगावरून कार जाऊ नये म्हणून काही आंदोलक प्रयत्नशील होते. अन्यथा, अनर्थ घडला असता. शिवाय सहकुटुंब शेकडो आंदोलन आंदोलनस्थळी होते. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. त्यामुळे कुठलाही उद्रेक करावा, असा हेतू नव्हता. अन्यथा, चेंगराचेंगरी होऊन अनर्थ घडला असता.

कुठलाही गैरप्रकार घडला नाही
खासदार गावित यांना लक्ष करून किंवा पूर्वनियोजित कट म्हणून त्यांच्यावर हल्ला, धक्काबुक्की केली, असा कुठलाच प्रकार घडलेला नाही. त्यामुळे त्यांनी मला लक्ष केल्याचा आंदोलनावर केलेला आरोप फेटाळून लावत आहे. या घटनेचा काही झारीतील शुक्राचार्य राजकीयदृष्ट्या गैरलाभ उठवून मराठा व आदिवासी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्याला या दोन्ही समाजाने बळी पडू नये. या समाजांमध्ये परस्परांविषयी कटुता निर्माण होऊ नये, असे सांगत शांततेकामी सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, निंबा मराठे, नाना कदम, संभाजीराव देसाई आदींनी पत्रकार परिषदेतून केले. या प्रकरणी वीस आंदोलकांवर खासदार गावित यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल झाला आहे.

Web Title: dhule district maratha kranti morcha and heena gavit issue