स्थायी समितीने बजेटमध्ये सुचविली21 कोटींवर वाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

धुळे - गरजा पूर्ण करून निधी जमा झाल्यास विकास कामे करू असे धोरण ठेवत महापालिका प्रशासनाने 241 कोटी रुपयांचे 2016-17 चे सुधारित व 2017-18 चे अंदाजपत्रक तयार केले होते. प्रशासनाच्या या अंदाजपत्रकात स्थायी समितीने काही तरतुदी सुचविल्या होत्या, या सुचविलेल्या तरतुदींचा आकडा तब्बल 21 कोटींवर गेला आहे. त्यामुळे महासभेपुढे जाण्यापूर्वीच महापालिकेचे अंदाजपत्रक 262 कोटींवर गेले आहे. प्रशासनाने नाकारलेल्या नगरसेवक निधीतही स्थायीने प्रत्येकी दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे. 

महापालिकेला आर्थिक स्रोत नसल्याने किमान गरजाही पूर्ण करताना आर्थिक कसरत करावी लागते त्यामुळे कोणत्याही विकास कामांची तरतूद नसलेले अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने तयार केले होते. स्थायी समितीत या अंदाजपत्रकावर चर्चा झाली. विकास कामांनाच कात्री लावणाऱ्या या अंदाजपत्रकावर टीका करत स्थायीने काही तरतुदी सुचवून 2016-17 चे सुधारित व 2017-18 च्या अंदाजपत्रकाला 31 मार्चच्या बैठकीत मंजुरी दिली होती. 

तरतुदींचा आकडा निश्‍चित 
स्थायी समितीने सुचविलेल्या तरतुदींचा आकडा नेमका किती हे त्यावेळी निश्‍चित झाले नव्हते, ते आता निश्‍चित झाले आहे. या निश्‍चित झालेल्या आकडेवारीनुसार स्थायी समितीने 21 कोटी 82 लाख 60 हजार रुपयांची वाढ सुचविल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाढीव तरतुदींमुळे महापालिकेचे अंदाजपत्रक आता 263 कोटी 69 लाख 95 हजार 904 रुपयांवर गेले आहे. 

एक कोटीची कपात 
स्थायी समितीने प्रशासनाने केलेल्या तरतुदीतील घंटागाडीच्या भाड्यामध्ये कपात केली आहे. प्रशासनाने तीन कोटी 25 लाख रुपयांची तरतूद केली होती. स्थायीने यात एक कोटी रुपयांची कपात केली आहे. 

26 कोटींचे उत्पन्नही सुचविले 
महापालिका प्रशासनाने "जीआयएस' मॅपिंग सर्वेक्षणानंतर मालमत्ता कर, मोबाईल टॉवरवरील दंडात्मक कर आकारणी, बीओटीद्वारे उत्पन्न, व्यापारी संकुल फेरलिलाव, अनधिकृत बांधकामे दंड आकारणी व विकास शुल्क, बिनशेतीसारा परवानगी, बखळ जागेवरील कर आकारणी, जमीन विकास शुल्क, व्यापारी संकुल हस्तांतर शुल्क, अनधिकृत नळ कनेक्‍शन अनधिकृत करणे आदी विविध माध्यमातून 33 कोटी 60 लाख रुपयांची वाढ सुचविली होती. यात स्थायी समितीने 26 कोटी 50 लाखांची वाढ सुचविली आहे. 

"स्थायी समितीने केलेली वाढ 
-नगरसेवक निधी- सात कोटी 75 लाख 
-विविध ठिकाणी प्रवेशद्वार उभारणी- एक कोटी 
-स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी- नऊ लाख 60 हजार (एकूण 10 लाख) 
-अमरधाम येथे विद्युत/ डिझेल दाहिनी- 50 लाख 
-अमरधाम/ दफनभूमी सुविधा व सुशोभीकरण- एक कोटी 
-वृक्ष लागवड व संवर्धन- आठ लाख (एकूण दहा लाख) 
-महापौर केसरी कुस्ती स्पर्धा-25 लाख 
-राष्ट्रीय खेळाडू व कलावंत सत्कार- दहा लाख 
-संभाजी महाराज, संत गाडगे महाराज पुतळा सुशोभीकरण व संत रविदास यांचा पुतळा बसविणे- 75 लाख 
-सांस्कृतिक कार्यक्रम- दहा लाख 
-प्रलंबित देयके देण्यासाठी- दहा कोटी 
-बायोगॅस प्रकल्प उभारणे-20 लाख 
-चौकांचे सुशोभीकरण- 25 लाख 

Web Title: dhule municipal corporation