रक्षाबंधनानंतर परतणार्‍या भावाचा अपघातात मृत्यू

जगन्नाथ पाटील
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

भावाकडून अखेरचीच माहेरची साडी
संतोषची परिस्थिती नाजूक होती. पण बहिणीसाठी कधीही अाखडता हात घेतला नाही. दिवाळी, आखाजी व रक्षाबंधनाला साडी ठरलेलीच असायची. आजची रक्षाबंधनाची साडी ही बहिणीसाठी भावाकडची अखेरचीच माहेरची साडी ठरली. बहिणीला ही बातमी कळल्यानंतर भोवळच आली. येथे आल्यानंतर हंबरडाच फोडला. साईला कवटाळत रडू आवरेनासे झाले होते.

धुळे : रतनपूरा (जि.धुळे) येथील संतोष पाटील सोमवारी सकाळपासूनच खुशीत होते. रक्षाबंधन असल्याने बहिणीकडे जाण्याची घाई होती. गुराढोरांचे लवकर आवरुन बहीणीकडे पोहचलेत. बहिणीने भावासह भाच्यालाही ओवाळले राखी बांधली. भावाने मायेची साडी भेट दिली. बहिणीनेही भावाच्या सुखी अायुष्याचा मनोमनी आशीर्वाद दिला. गोडधोड खाऊ घातले. गुराढोरांचे आवरण्याची घाई असल्याने परतीला निघालेत. गरताड (ता.धुळे) जवळ कंटेनरने उडविले. दोन्ही बापलेक फेकले गेले. संतोष जागीच ठार झाला. तर मुलगा जखमी झाला. बहिणीसाठी भावाने घेतलेली ती अखेरचीच माहेरची साडी ठरली.

कंटेनरने उडविले
रतनपुरा येथील संतोष सुभाष पाटील (वय 34) येथून सकाळीच चौपडी कोंढावळ ता.अमळनेर येथे बहिणीकडे निघालेत. सोबत पाच वर्षांचा मुलगाही होता. बहिणीने भावासह भाच्यालाही आल्यालाच ओवाळले. दोघांना गोडधोड पक्वानचा पाहूणचार तयारच होता. मेहूण्यासह सगळ्यांनीच आस्वाद घेतला. दुभत्या जनावरांचे आवरण्याचे असल्याने बहिणाचा आशिर्वाद घेत परतीचा प्रवासाला निघालेत. गाव अवघे दहा पंधरा किमीवर राहिले होते. धुळे सोलापूर महामार्गावरील गरताडजवळील गतिरोधकजवळ धुळेकडून  येणार्‍या कंटेनरने (एचआर 61, सी 5078) मोटारसायकलला (एमएच 18 , इ 9849) उडविले. यात संतोष पाटील (वय34) व मुलगा(वय 5) साई हे दोन्ही फेकले गेलेत. यात संतोष पाटील जागीच ठार झालेत. तर साई किरकोळ जखमी झाला. कंटेनरला गरताड ग्रामस्थांनी मोहाडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिला. संतोष पाटीलच्या मागे पत्नी, मुलगा साई, मुलगी नंदनी, बहिण मिना व वृध्द आईवडिल आहेत.

भावाकडून अखेरचीच माहेरची साडी
संतोषची परिस्थिती नाजूक होती. पण बहिणीसाठी कधीही अाखडता हात घेतला नाही. दिवाळी, आखाजी व रक्षाबंधनाला साडी ठरलेलीच असायची. आजची रक्षाबंधनाची साडी ही बहिणीसाठी भावाकडची अखेरचीच माहेरची साडी ठरली. बहिणीला ही बातमी कळल्यानंतर भोवळच आली. येथे आल्यानंतर हंबरडाच फोडला. साईला कवटाळत रडू आवरेनासे झाले होते.

दरम्यान संतोषच्या जाण्याने रतनपुरासह बोरकुंड सुन्न झाले आहे. बैलघेवड्या संतोषच्या जाण्याने मोठी शोककळा पसरली आहे. सायंकाळी सहाला अंत्यसंस्कार झालेत.पाच वर्षांच्या साईने मुखाग्नी दिला.

Web Title: Dhule news accident in dhule