महिलांनो, मुलीला मुलगी म्हणूनच वाढवा: ऍड. अपर्णा रामतीर्थंकर

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ऍड. अपर्णा रामतीर्थंकर बोलत होत्या. आई आणि शिक्षक हे समाजातील दोन मुख्य जबाबदार घटक आहेत. महिलांनो,नवरा जिंकायचा असेल तर आधी सासूला जिंका. कारण पुरुषांच्या हृदयाच्या पहिल्या कप्प्यात नेहमी आईच असते. बायको नेहमी दुसऱ्या कप्प्यात असते. याचे भान ठेवावे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : महिलांनो, मुलीला मुलीप्रमाणेच वाढवा. तिला मुलाप्रमाणे वाढवू नका. मुलींच्या आईंनो, मुलींच्या संसारात जास्त ढवळाढवळ करू नका. हस्तक्षेप करू नका. महाराष्ट्रात न्यायालयांमध्ये सुमारे साडेतीन लाख घटस्फोटाच्या केसेस दाखल आहेत. म्हणून कायद्याचा वापर करा. पण कायद्याचा गैरवापर करू नका. असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका ऍड. अपर्णा रामतीर्थंकर यांनी निजामपूरला म्हसाई माता महिला पतसंस्थेतर्फे "चला नाते जपू या" या कार्यक्रमात केले.

येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ऍड. अपर्णा रामतीर्थंकर बोलत होत्या. आई आणि शिक्षक हे समाजातील दोन मुख्य जबाबदार घटक आहेत. महिलांनो,नवरा जिंकायचा असेल तर आधी सासूला जिंका. कारण पुरुषांच्या हृदयाच्या पहिल्या कप्प्यात नेहमी आईच असते. बायको नेहमी दुसऱ्या कप्प्यात असते. याचे भान ठेवावे. एक बाप पाच मुलांना चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. पण पाच मुलं एका बापाला सांभाळू शकत नाही. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हा परिषद सदस्या उषाबाई ठाकरे, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, म्हसाई माता महिला पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत शाह, अध्यक्षा उर्मिलाबेन शाह, उपाध्यक्षा स्नेहल राणे, सदस्या योगीताबेन शाह, भिकन जयस्वाल, ललित आरुजा, राजेंद्र राणे, सुहासभाई शाह, जगदीश शाह, रघुवीर खारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शक प्राचार्य मदन शिंदे, व्यवस्थापक निलेश जयस्वाल आदींसह पतसंस्थेचे संचालिका मंडळ, निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान, म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक आदींसह भानुबेन वाणी पब्लिक स्कुल व आशुमतीबेन शाह विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व म्हसाई माता महिला पतसंस्थेच्या संचालिका मंडळ व  कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. लक्ष्मीकांत शाह यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य मदन शिंदे व व्यवस्थापक निलेश जयस्वाल यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका वंदना शाह यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठया संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

Web Title: Dhule news Aparna Ramtirthkar in jaitane