पेहरावाने गैरसमजातून झाला भिक्षेकरींचा घात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पिंपळनेर - क्रूरतेचा कळस गाठत अफवेने घेतलेल्या पाच भिक्षेकऱ्यांच्या बळीत त्यांचा पेहराव कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातून आलेले ही नाथपंथीय कुटुंबे येथील साक्री- धुळे रस्त्यावरील शिवाजी भोये यांच्या पेट्रोल पंपाजवळील शेतात पाल टाकून थांबले होते. 

राईनपाडा (ता. साक्री) येथील आठवडे बाजार असल्याची माहिती मिळाल्याने या बाजारात दोन पैसे अधिकचे मिळतील, या अपेक्षेपोटी हे सर्व जण तेथे गेले होते. भिक्षा मागण्यासाठी जाताना गळ्यात कवड्यांची व तुळशी माळ असा त्यांचा पेहराव होता. त्यांच्या या पेहरावाने बहुरूपींचे ढोंग करून मुले पळविणारी टोळीच आहे, या समजातून त्यांना जमावाने बेदम मारहाण केल्याचे बोलले जात आहे. 

घटना समजताच मृताचे कुटुंब व नातेवाईक महिला नबाबाई भोसले, शारदा मावळी, कल्पना भोसले यांनी हंबरडाच फोडला. पोलिसांना या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री दादा भुसे, आमदार डी. एस. अहिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विशाल देसले आदींनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Web Title: dhule news bhikshekari murder case child theft case