मयत प्रेमिकेस सोडून प्रेमी फरार

एल. बी. चौधरी
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

सोनगीर (जि. धुळे)  - विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरूण प्रेमिकेस सोडून प्रेमी फरार झाला. मात्र प्रेमिका व प्रेमी कोण याचा उलगडा होत नसल्याने पोलीसांपुढे आव्हान उभे राहिले होते. पोलिसांनी प्रेमिकेचे नातेवाईक शोधून काढल्याने काल (ता. 31) उलगडा झाला. त्यामुळे एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली. 

सोनगीर (जि. धुळे)  - विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरूण प्रेमिकेस सोडून प्रेमी फरार झाला. मात्र प्रेमिका व प्रेमी कोण याचा उलगडा होत नसल्याने पोलीसांपुढे आव्हान उभे राहिले होते. पोलिसांनी प्रेमिकेचे नातेवाईक शोधून काढल्याने काल (ता. 31) उलगडा झाला. त्यामुळे एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली. 

सरवड (ता. धुळे) फाट्यावर मुंबई आग्रा महामार्गालगत गेल्या 15 जूनला आदिवासी तरूण व तरुणी मोटारसायकलजवळ उभे होते.  सरवडला कामानिमित्त राहणाऱ्या बेबाबाई कालू पावरा या आदिवासी महिलेने त्यांना पाहिले. आपल्याच भागातील असल्याने तिने सहज विचारपूस केली असता त्यांनी आम्ही घरून पळून आलो असून घरच्यांचा लग्नाला विरोध आहे. आता कुठे जावे कळत नाही व चार ते पाच दिवसापासून काही खाल्ले नाही. आम्हाला मदत कर अशी विनंती केली. बेबाबाईने त्यांना जेवू घातल्यानंतर तिच्याकडेच ते राहिले. बेबाबाईच्या मध्यस्थीने त्यांना शेतात काम मिळाले. बेबाबाईच्या घराशेजारीच भाड्याने घर घेतले. बेबाबाईला त्याने दिनेश पवार (वय 24)  व मुलीचे कल्पना (वय 20) असे नाव सांगितले होते. दरम्यान 24 जुलैला कल्पनाने अरूण गिरधर बोरसे (रा. सरवड) यांचे शेतात सकाळी विषारी औषध प्राशन केले. तिला दिनेशने आधी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण ती अत्यवस्थ अवस्थेत असल्याने तिला धुळ्यात शासकीय रुग्णालयात हलवावे असे येथील वैद्यकीय अधिकारींनी सांगितल्याने दिनेशने तिला धुळ्याला नेले. तेथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती मयत झाली. दिनेशने धुळ्याला जातांना शेजारच्या एकाकडून त्याचा मोबाईल घेतला होता. त्या मोबाईलने कल्पना मयत झाल्याचे त्याने बेबाबाई व शेतमालकाला सांगितले. सरवडहून तीनचार जण शासकीय रुग्णालयात पोहचले तेव्हा दिनेश कुठेही दिसला नाही. सर्व जण रात्री उशिरा घरी पोहोचले. त्यांनी मोबाईलवर संपर्क साधला असता दुसर्‍या एकाने हिंदीत मोबाईलधारकाचा पारोळा चौफुलीवर अपघात झाल्याचे सांगितले. सकाळी दिनेशने मी जखमी असून शासकीय रुग्णालयात दाखल आहे असे सांगितले. सरवडकरांनी तपास केला असता तेथेही तो आढळला नाही. आजही तो फरार आहे. दरम्यान मुलीची ओळख पटत नसल्याने पोलीसांनी 27 जुलैला देवपूर येथील स्मशानभुमीत जिथे बेवारस प्रेत दफन केले जातात तेथे दफनविधी केला. 

दरम्यान मुलीने ती फत्तेपूर (आमोदा) ता. शहादा येथील मुळ रहिवासी असल्याचे बेबाबाईला एकदा सांगितले होते. पोलिसांनी तिथे तपास केला असता तिचा भाऊ विनोद मंगलसिंग ठाकरे हा म्हसावद (ता. शहादा) येथे  राहत असल्याचे समजले. तेथील पोलीसांना सोशल मीडिया द्वारे तिचा फोटो पाठविला. म्हसावद पोलीसांनी विनोदला शोधून फोटो दाखवला तेव्हा त्याने ओळखले. कल्पना ही तिची आई व भावासह जुनागढ (गुजरात) येथे  करीत होती. समोरच दिनेश पवार (राहणार धडगाव) राहत होता व मजुरी करीत होता. त्याचे कल्पनाशी प्रेमसंबंध जुळले व तेथून ते पळून आले. दरम्यान दिनेशजवळ असलेली मोटारसायकल ( क्रमांक एमएच 39, एम 1829) चोरीची निघाली असून ती शहादा येथून चोरीस गेली आहे. दिनेश मोटारसायकल व मोबाईल घेऊन फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तपास उपनिरीक्षक आर. डी. पाटील करीत आहेत.

Web Title: dhule news crime