धुळेः सत्ताधारीच म्हणताहेत दोषींवर करा फौजदारी गुन्हे दाखल

जगन्नाथ पाटील
मंगळवार, 25 जुलै 2017

कापडणे (ता. जि. धुळे) : येथील तीन कोटी चौदा लाखाची सोनवद प्रकल्प पाणी पुरवठा योजनेची जिल्हा परीषदे मार्फत चौकशी सुरु आहे. त्यानंतर पंचायत राज समितीकडे मागणी केल्यानंतर महाराष्ट्र जिवन प्राधिकरणमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या योजनेवरुन येथील दोन्ही गटांत मोठे राजकारण सुरु आहे. आता सत्ताधारी गटानेच चौकशी अहवाल तात्काळ द्यावेत. कोण दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे निवेदनच मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. यांना दिले.

निवेदनाचा आशय : सोनवद पाणी पुरवठा योजनेची चौकशी संथगतीने सुरु आहे. त्याची तात्काळ चौकशी पूर्ण करणे गरजेचेच आहे. चौकशी पूर्ण झाल्याचेही समजते. अशा स्थितीत अहवाल देण्यास उशिर करु नये. दोषींवर कारवाई झाल्याच पाहिजे, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर सरपंच भटू पाटील, प्रमोद पाटील, भय्या पाटील, मनोज पाटील, चंदू भिल, रमा भामरे आदींनी केली आहे. ही योजना जिल्ह्याच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.

आता वेगळे वळण...
भाजपाचे बापू खलाणे, ग्रामपंचायत सदस्य भटू पाटील, राजेंद्र माळी, किशोर पाटील यांनी पीआरसीसमोर तीन कोटी चौदा लाखाच्या सोनवद पाणी पुरवठा योजनेविषयी तक्रारीं केल्या होत्या. त्यापूर्वीही त्यांच्या मागणीनुसार चौकशी अंतीम टप्यात आहे. आता सत्ताधारी गटानेच अहवाल तात्काळ द्या. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी केल्याने पाणी पुरवठा योजनेला वेगळेच वळण मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, पहिल्या टप्याचे काम माजी सरपंच किशोर पाटील यांच्या काळात पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा गटनेते भगवान पाटील यांच्या कालावधीतीत पूर्ण झाला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ही योजना जिल्ह्याच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: dhule news Criminal cases filed against the accused are to blame