धुळे शहरात महिनाभरात डेंगीचे 80 रुग्ण

जगन्नाथ पाटील
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

सर्वाधिक उपाययोजना कापडणेत पण...
डेंगी सदृश्य रुग्ण  कापडणेत अधिक आढळत असल्याचे वातावरण होते. यासाठी कोरडा दिवस, फवारणी, गटारींमध्ये आॅईल टाकणे. अॅबेटींग करणे. तालुका व जिल्हा आरोग्य पथकांनीही भेटी देणे सुरु केले होते. प्रत्यक्षात येथे केवळ एकच रुग्ण पाॅझीटिव्ह आढळला. परिणामी ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

धुळे : जिल्ह्यात डेंगी सदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामीण पेक्षा धुळे शहरात गंभीर परिस्थिती आहे. महिनाभरात धुळे शहरात डेंगी दुषित रुग्ण 80 तर ग्रामीणमध्ये एकोणीस आढळलेत. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये विविध रुग्ण उपचार घेत आहेत. नगाव, देवभाने, कुसुंबा, नरडाणे येथे दोनपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. धुळे शहरातील परिस्थिती गंभीर आहे. ग्रामीण भागात जिल्हा परीषदेची आरोग्य यंत्रणा पुर्णतः लक्ष ठेवून आहे. कापडणे येथे सर्वाधिक उपाययोजना सुरु आहेत.

जिल्ह्यात दीपावली पर्व सुरु आहे. मिणमिणत्या दिव्यांनी आसमंत उजळत आहे. यास दुष्काळाचीही किनार आहे. अशातच डेंगी सदृश्य रुग्णांमुळेही भितीचे वातावरण निर्माण होत आहे. शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. डेंगीसाठी तीन टेस्ट महत्वपूर्ण आहेत. त्यापैकी पहिलीच टेस्ट पाॅझिटिव्ह दाखवते. तर दोन निगेटिव्ह येत असल्याने समाधानही व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागापेक्षा धुळे शहरातील वातावरण गंभीर आहे. सप्टेंबरसह चालू महिन्यातील आकडा ऐंशीवर गेला आहे. त्या अनुषंगाने शहरात उपाययोजनाही सुरु झाल्या आहेत. ग्रामीण भागात एकुण एक्केचाळीस प्राथमिक अारोग्य केंद्र आहेत. त्यापैकी नगाव, कापडणे,मुकटी, कुसुंबा, शिरुड, जैताणे, नरडाना, चिमठाणे या केंद्रात रुग्ण आढळले आहेत. शिरपूर तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही.

सर्वाधिक उपाययोजना कापडणेत पण...
डेंगी सदृश्य रुग्ण  कापडणेत अधिक आढळत असल्याचे वातावरण होते. यासाठी कोरडा दिवस, फवारणी, गटारींमध्ये आॅईल टाकणे. अॅबेटींग करणे. तालुका व जिल्हा आरोग्य पथकांनीही भेटी देणे सुरु केले होते. प्रत्यक्षात येथे केवळ एकच रुग्ण पाॅझीटिव्ह आढळला. परिणामी ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.  देवभानेत ही संख्या पाच आहे. धुळे शहरातील बोरसे नगरमध्ये डेंगीमुळे दोन युवकांचा मृत्यू झाला होता. मात्र दोन्हीही रुग्णांना डेंग्यूची लागण नसल्याचे आरोग्य विभागाकडे रिपोर्ट असल्याचे समजते. भितीचे वातावरण आहे. दरम्यान धुळे शहरात आता आरोग्य विभाग अधिक लक्ष ठेवून आहे.

शहर/गावे    डेंगी दूषीत रुग्ण
धुळे शहर - 80
नगाव - 4
कापडणे - 1
देवभाने - 6
मुकटी - 1
कुसुंबा - 2
शिरुड - 1
जैताणे - 1
नरडाना - 2
चिमठाणे - 1
एकूण - 99

Web Title: Dhule news Dengue patient in Dhule