देऊरच्या विमा सेवा केंद्राचा लाभ घ्या: देशमुख

तुषार देवरे
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नवल दोधू शेवाळे ,एन.बी.शिंदे, डाॅ.विजय देवरे, दिलिप भिवसन देवरे, अशोक आनंदा पगारे, संजय वामन देवरे यांनी विम्याचे आपल्याला आलेले अनुभव सांगितले.धुळे, साक्री नंतर थेट देऊर ला विमा केंद्राचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. विमा ची माहिती, भरणा बाबत येथील परिसरातील ग्रामस्थांना थेट धुळे ला जावे लागत होते.

धुळे : देऊर परिसरातील भारतीय जीवन विमा निगम ग्राहकांनी सर्व प्रकारच्या  नवीन पाॅलीसी ची माहितीसह, जुन्या पाॅलिसींची सध्यस्थिती, पाॅलिसी प्रिमीयम पाहण्यासाठी येथील विमा सेवा केंद्राचा आवश्यक लाभ घ्यावा; असे आवाहन धुळे एल.आय.सी. शाखेचे विकास अधिकारी आबासाहेब देशमुख यांनी येथे केले.

काल छत्रपती  शिवाजी महाराज चौकातील शाॅपिंग गाळ्यात त्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.जेष्ठ नागरीक धुडकू लोटन देवरे, नवल बुधा देवरे ,गंगाराम दोधू शेवाळे,रविंद्र नानासाहेब देवरे, हिमंतराव धवळू देवरे,विश्वासराव नानासाहेब देवरे,साहेबराव भिला देवरे,आनंदा दोधू शेवाळे वामन हंसराज देवरे,डिगंबर आत्माराम देवरे आदि उपस्थित होते.

नवल दोधू शेवाळे ,एन.बी.शिंदे, डाॅ.विजय देवरे, दिलिप भिवसन देवरे, अशोक आनंदा पगारे, संजय वामन देवरे यांनी विम्याचे आपल्याला आलेले अनुभव सांगितले.धुळे, साक्री नंतर थेट देऊर ला विमा केंद्राचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. विमा ची माहिती, भरणा बाबत येथील परिसरातील ग्रामस्थांना थेट धुळे ला जावे लागत होते. ती आता सोय गावस्तरावर झाली आहे. येथे व परिसरात विमा संदर्भात बहुतांश ग्रामस्थांच्या समस्या होत्या. सूत्रसंचालन संजय देवरे यांनी केले. आभार प्रतिनिधी लक्ष्मण देवरे यांनी मानले.

Web Title: Dhule news devur crop insurance

टॅग्स