गरजूंच्या चेहऱ्यावर फुलविला आनंद

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

सुरुवातीला वाचनालयातर्फे ग्रामस्थांना सुस्थितीतील कपडे व साड्या आदी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संचालक मंडळासह ग्रामस्थांनी सुमारे 70 ड्रेस व साड्या संकलित करून वाचनालयात जमा केले.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): येथील स्व.वर्षाबेन अजितचंद्र शाह स्मृती- जवाहरलाल वाचनालयातर्फे दिवाळीनिमित्त परिसरातील गरजूंना नुकतेच मोफत वस्त्रवाटप करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह व संचालक मंडळ आदींनी गरीब व गरजूंना वस्त्रवाटप केले. संचालक मनोहर राणे यांच्या संकल्पनेतून व संचालक मंडळाच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

सुरुवातीला वाचनालयातर्फे ग्रामस्थांना सुस्थितीतील कपडे व साड्या आदी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संचालक मंडळासह ग्रामस्थांनी सुमारे 70 ड्रेस व साड्या संकलित करून वाचनालयात जमा केले. ते सुस्थितीतील कपडे ईस्त्री करुन गरजूंना देण्यात आले. याबाबत ग्रामस्थ व सभासदांमार्फत, सोशल मीडियाद्वारा ताबडतोब निरोपही देण्यात आला. अवघ्या काही तासांतच सर्व वस्त्रांचे वितरण झाले. वाचनप्रेरणेसह सामाजिक बांधिलकीतून वाचनालयातर्फे राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे निजामपूर-जैताणेसह परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

"सर्वसामान्यांना परिस्थितीमुळे दिवाळीला नवे कपडे घेऊन सण साजरा करणे शक्य होत नाही म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी वाचनालयातर्फे हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. पुढील वर्षी अजून व्यापक व मोठया स्वरूपात हा उपक्रम राबविला जाईल." अशी प्रतिक्रिया वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: Dhule news diwali in sakri