धुळे : गुंड गुडड्याचा गोळ्या घालून खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात गुड्डयाचा जामिन झाला होता. त्यामुळे तो शहरात बिनधास्तपणे वावरताना दिसत होता. आठवड्यापासून शहरातल्या विविध भागात बुलेटवरची त्याची स्वारी चर्चेचा विषय ठरली होती. विविध गुन्ह्यातून त्याने रग्गड पैसा कमविल्यामुळे त्याचे राहणीमानही उंचावले होते.

धुळे : महापालिका कर वसूली विभागाच्या अग्निकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी, खून आणि चोऱ्या, किडनॅपिंग, जाळपोळ, खंडणी यासह विविध गंभीर गुन्ह्यातला 
संशयित रफिकोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याचा शहरात आज (मंगळवार) पहाटे सहाच्या सुमारास निर्घृण खून झाला. वर्दळीच्या पारोळा रोडवर असलेल्या कराचीवाला खुंटाजवळ गोपाल टीसमोर ही थरारक घटना घडली.

काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात गुड्डयाचा जामिन झाला होता. त्यामुळे तो शहरात बिनधास्तपणे वावरताना दिसत होता. आठवड्यापासून शहरातल्या विविध भागात बुलेटवरची त्याची स्वारी चर्चेचा विषय ठरली होती. विविध गुन्ह्यातून त्याने रग्गड पैसा कमविल्यामुळे त्याचे राहणीमानही उंचावले होते. जळगाव, नगर, नाशिक, मुंबई अशा ठिकठिकाणी त्याचे कनेक्‍शन असल्यामुळे आणि तेथील वादातून तो अनेक टोळ्यांच्या हिटलिस्टवर होता. अशात आज पहाटेच्या सहाच्या सुमारास तो गोपाल टी हाऊसवर आला.

पहाटे पाचला त्याला रपेट मारण्याची सवय होती. नंतर तो गोपाल टी हाऊसवर चहा पीत असताना इंडिका कारमधून तीन ते चार जण व मोटारसायकलवरून काही जण, असे मिळून दहा ते बारा मारेकरी टी हाऊसजवळ आले. मारेक-यांनी गुड्ड्या हाॅटेलमधून खेचून बाहेर काढले. कारमधील एकाने त्याच्यावर गोळी झाडली. नंतर गुड्ड्या शेजारील गोपाल हाऊसजवळील एका गल्लीत बचावासाठी पळाला. इंडिका कारमधील तीन ते चार संशयितांसह अन्य मारेक-यांनी त्याला पुन्हा पकडले आणि गोपाल टी हाऊस समोरच रस्त्यावर आणले. तेथे धारदार शस्त्राने गुड्ड्याच्या मानेवर खोलवर वार केली. शिवाय दोन गोळ्याही गुड्ड्यावर झाडल्या. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नंतर कारमधील संशयित व अन्य मारेकरी हे आग्रा रोडवरून पसार झालेत. वर्दळीच्या रस्त्यावर हा थरार घडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. एलसीबीने चंद्रमणी चौकातून एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Dhule news don guddya killed in firing

टॅग्स