धुळे: देऊर गाव दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

drought situation in devur
drought situation in devur

देऊर : गेल्या तीन वर्षेपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीने ग्रासलेल्या देऊर (ता. धुळे) गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या यंदाही केलेल्या नाहीत. जे पेरणी केलेले पीक होते, त्या खरीप पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे.

परिसरात नदीनाले व चार लघुप्रकल्प अद्यापही कोरडेठाकच पडले आहेत. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन खरी वस्तुस्थिती मांडून अहवाल तयार करावा. केवळ रिमझिम पावसावरची सरकारी फुगवलेले आकडेवारी वर न जाता प्रत्यक्षात स्थिती महसूल, कृषी, विमा कंपनी यांनी संयुक्त विद्यमाने जाणून घ्यावी. गावाची नजर आणेवारी 50 पैसे च्या आत लावण्यात यावी. अशा आशयाचे ग्रामस्थांचे सह्यांचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अंतुर्लीकर यांना आमदार डी.एस.अहिरे, माजी आमदार जे.यू.ठाकरे,माजी सरपंच नवल बुधा देवरे, विकास संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव देवरे, जेष्ठ नागरिक नवल शेवाळे, वामनराव देवरे, मोतिराम देवरे,जवाहर सूतगिरणी माजी संचालक हिंमतराव देवरे, सामाजिक कार्यकर्ते दिलिप देवरे, काळू देवरे, किरण देवरे आदिं शेतकर्यांनी देऊन, जिल्हाधिकारी दिलिप पांढरपट्टे यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा करून, वस्तुस्थिती मांडली. निवेदन उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे, मंडळाधिकारी छोटू चौधरी यांना ही यांनाही आजच देण्यात आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामपंचायत, विकास सेवा संस्था, कामधेनू दुग्ध उत्पादक संस्थानी सर्व साधारण सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे.संबंधित ठरावाची प्रत ही निवेदनासोबत देण्यात आली आहे. सध्या परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी ही खालावली आहे.जनावरांना चारा टंचाई भासत आहे.उत्पन्न घटले आहे. दुष्काळी परिस्थिती असूनही नेर मंडळात सदोष पर्जन्यमापकामुळे चुकीचे आकडे जिल्हा प्रशासनाला दिले जात आहे व सरकारी आकडेवारी फुगवून दिशाभूल केली जात आहे. 

नेर मंडळात देऊर गावावर अन्याय होऊ नये, ही  आर्त हाक येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मांडले आहे.अन्यथा गावातील ग्रामस्थ, शेतकरी आंदोलन छेडतील. सातत्याने तीन वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात सापडलेला शेती व दुग्ध व्यवसायाला या वर्षी ही धुळे तालुक्यातील देऊर परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. रिमझिम पावसावर तग धरून असलेली पिके आता माना टाकू लागले आहेत. नेर मंडळात कोणत्या गाव निहाय शिवारात काय पीक स्थिती आहे. याची नोंद प्रत्यक्ष होणे गरजेचे आहे. मात्र याची कुठलीही वास्तवता दिसत नाही. गेल्या वर्षी ही नेर मंडळात ढग फुटीची आकडेवारी कागदोपत्री दाखविण्यात आली होती.  तालुक्याचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेत शिवारात भेटी द्याव्यात. अशी मागणी होत आहे. ' गहू सोबत किडे  रगडू नये ' एवढे मात्र नक्कीच. सदोष पर्जन्यमापकाचे  चुकीचे आकडे ग्राह्य धरू नयेत. देऊर च्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com