शिक्षणाशिवाय समाजपरिवर्तन अशक्य : डॉ. सुधीर तांबे

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

निजामपूरला 'रंगतरंग' कार्यक्रमाचे उदघाटन

निजामपूर-जैताणे (धुळे) : शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य व नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

निजामपूरला 'रंगतरंग' कार्यक्रमाचे उदघाटन

निजामपूर-जैताणे (धुळे) : शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य व नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित भानुबेन वाणी पब्लिक स्कुल व आशुमतीबेन शाह विद्यालयातर्फे म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित 'रंगतरंग' स्नेहसंमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार डी.एस. अहिरे प्रमुख अतिथी होते.

भानुबेन वाणी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह माजी खासदार बापू चौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष पोपटराव सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य विलास बिरारीस, प्रभाकर बच्छाव, पंचायत समिती सभापती गणपतराव चौरे, सदस्य उत्पल नांद्रे, प्रा. नरेंद्र तोरवणे, रवींद्र भदाणे, अशोकभाई शाह, सुरेशभाई शाह, गजेंद्रभाई शाह, हेमंतभाई शाह, ललित आरुजा, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदूलाल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, जिल्हा परिषद सदस्या उषाबाई ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष प्रमोदचंद्र शाह, उपाध्यक्ष बाबूलाल वाणी, सचिव लक्ष्मीकांत शहा व संचालक मंडळाचे सर्व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. दोन्हीही ग्रामीण भागातील विनाअनुदानित विद्यालये असूनही पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण, संस्कार, शिस्त व कलेची साधना आदींबाबत मान्यवरांनी संस्थेच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. डॉ. सुधीर तांबे, शिवाजीराव दहिते, आमदार अहिरे व भानुबेन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनीही संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमास संस्थेसह म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्ट, म्हसाई माता महिला पतसंस्था, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे सचिव लक्ष्मीकांत शाह, मार्गदर्शक मदनमोहन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संचालक वासुदेव बदामे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. मुख्याध्यापक मनोज भागवत यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिक्षिका योगिता कोळी, ईशानी शाह, प्रसन्ना शाह, पूनम कोठावदे आदींनी केले.

Web Title: dhule news education mla dr sudhir tambe