धुळे: 72 गावांवर वीजपुरवठा खंडितची नामुष्की; सुमारे 6 कोटीची थकबाकी

जगन्नाथ पाटील
गुरुवार, 27 जुलै 2017

बहात्तर गावांत पाणी टंचाई
जिल्ह्यातील बहात्तर गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचायतीचे पदाधिकारी वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी आमदार, खासदार व जिल्हा परीषदेचे पदाधिकारी यांची गळ घालित असल्याची स्थिती आज पाहायला मिळाली.

कापडणे : जिल्ह्यातील बहात्तर  गावांचा पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा  आजपासून खंडीत झाला आहे. वीज वितरण कंपनीने ही कठोर कारवाई केली आहे. सहा कोटी सेहेचाळीस लाख एवढी थकबाकी आहे. यात सर्वाधिक थकबाकी कापडणे ग्रामपंचायतीवर आहे. एक कोटी चार लाख थकबाकी आहे. बहात्तर गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सरपंचासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांची पळापळ सुरु झाली आहे. काही सवलत मिळेल का, अंशतः पैसे भरुन वीज कनेक्शन पुर्ववत करण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे.

जिल्ह्यातील बहात्तर ग्रामपंचायतींचे एकशे बावीस पाणी पुरवठ्याचा वीज जोडण्या  आहेत. त्यांच्या बीलापोटी सहा कोटी सेहेचाळीस लाखाची थकबाकी आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून वीजबील थकबाकी आहे. पंचायती अल्पशा प्रमाणात बील रक्कम भरण्याचा प्रयत्न करतात. वितरण कंपनीने वीज जोडणी कट केल्यानंतरच बील भरतात. अन्यथा पंचायतीचे पदाधिकारी दुर्लक्षच करीत असतात. परीणामी कटू कारवाईचा सामना त्यांना वारंवार करावा लागत असतो.

कंपनीतर्फे वीज बील भरण्यासाठी नवसंजीवनी योजना आहे. पंचायतींना वारंवार बजावूनही लक्ष देत नाहीत. यात मोठी सवलत मिळत असते. काही प्रमाणात रक्कम भरल्यानंतर वीज पुरवठा पुर्ववत होण्याचे संकेतही कार्यकारी अभियंता के.डी. पावरा व मनिषा कोठारे यांनी दिलेत. त्यांनी बहात्तर गांवाची नावे सांगण्यास नकार दिला.

बहात्तर गावांत पाणी टंचाई
जिल्ह्यातील बहात्तर गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचायतीचे पदाधिकारी वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी आमदार, खासदार व जिल्हा परीषदेचे पदाधिकारी यांची गळ घालित असल्याची स्थिती आज पाहायला मिळाली.

कापडणे पंचायतीवर एक कोटी चार लाखाची थकबाकी
येथील पंचायतीच्या पाणी पुरविठ्यासाठी दहा वीज जोडण्या आहेत. गेल्या वीस वर्षांपासून थकबाकी आहे. एवढी रक्कम उभी करणे कठीण आहे. पंचायतीचे एवढे उत्पादन नाही. बील कसे भरावे हा पंचायत पदाधिकार्‍यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. तीन दिवस सलग पाणी पुरवठा झाल्यानंतरच येथे चौथ्या दिवशी दुसर्‍यांदा पाणी पुरवठा होत असतो.

Web Title: Dhule news electricity in villages