निजामपूरला रोजगार प्रशिक्षण मेळावा; अडीचशेवर बेरोजगारांची नोंदणी

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

साक्री तालुक्यातील बेरोजगार युवकांचा या योजनेतील नगण्य सहभाग पाहता साक्री, निजामपूर-जैताणे व छडवेल-कोर्डेसह माळमाथा परिसरातील बेरोजगार युवकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. किमान 10 वी उत्तीर्ण बेरोजगारांनी या प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी दहिते यांनी केले. युसुफ सय्यद यांनी बीपीएल व्यतिरिक्त सर्व गरजू उमेदवारांना सरसकट या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला. त्याबाबत आमदार डी. एस. अहिरेंनी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले व 'बीपीएल'ची अट शिथिल केली.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, साक्री पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत निजामपूर ग्रामपंचायत कार्यालयात आज रोजगार मेळावा झाला. यात पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना तीन महिन्याचे मोफत रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोजगार मेळाव्यात अडीचशेवर बेरोजगारांनी नावनोंदणी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते अध्यक्षस्थानी होते.

आमदार डी.एस. अहिरे, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, सरपंच साधना राणे, उपसरपंच रजनी वाणी, माजी सरपंच अजितचंद्र शाह, ग्रामपंचायत सदस्य सलीम पठाण, प्रवीण वाणी, युसुफ सय्यद, चंदूलाल जाधव, लक्ष्मीकांत शाह, ताहीरबेग मिर्झा, जाकीर तांबोळी, ललित आरुजा, अभियंता राजेंद्र कुकावलकर, विस्तार अधिकारी जगदीश खाडे, पी.एस. महाले, श्री. नेरकर, ग्रामविकास अधिकारी श्री. पवार, योगेंद्र सोनवणे, शरद पाटील, विजय राणे, महेश राणे, विजय महाले, चिंधु शिंपी, अझहर शेख, रघुवीर खारकर, नाशिक येथील चारही कंपन्यांचे प्रतिनिधी संदीप देवरे, आझीम शेख, श्री. देसले, श्री. महाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

साक्री तालुक्यातील बेरोजगार युवकांचा या योजनेतील नगण्य सहभाग पाहता साक्री, निजामपूर-जैताणे व छडवेल-कोर्डेसह माळमाथा परिसरातील बेरोजगार युवकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. किमान 10 वी उत्तीर्ण बेरोजगारांनी या प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी दहिते यांनी केले. युसुफ सय्यद यांनी बीपीएल व्यतिरिक्त सर्व गरजू उमेदवारांना सरसकट या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला. त्याबाबत आमदार डी. एस. अहिरेंनी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले व 'बीपीएल'ची अट शिथिल केली.

यावेळी चार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समितीचे अधिकारी, निजामपूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रोजगार मेळाव्याचा सुमारे अडीचशेवर बेरोजगार युवकांनी लाभ घेतला.

Web Title: Dhule news employment in jaitane