धुळे: माजी सैनिकांना घरपट्टी माफीचा ठराव

तुषार देवरे
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

तनिष्का सदस्याला ध्वजारोहणाचा मान
ध्वजारोहनाचा मान तनिष्का सदस्या तथा महिला ग्रामपंचायत सदस्या विजया नामदेव माळी यांना देवुन एक आदर्श निर्माण केला. एरव्ही ध्वजारोहण करण्यासाठी गावा गावात रस्सीखेच असते. मात्र नेर ग्रामपंचायतीचे सरपंच शंकरराव खलाणे यांनी महिला सदस्याला हा मान दिला.

धुळे : नेर (ता.धुळे) येथे काल झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीतर्फे "देशासाठी त्याग केलेल्या माजी सैनिकांसाठी आजपासून घरपट्टी माफीचा निर्णय घेण्यात आला."  या निर्णयाचे नेर परिसरातून स्वागत करण्यात येऊन, येथील माजी सैनिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकरराव खलाणे होते.उपसरपंच दत्त्तात्रय सोनवणे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी संजय देवरे आदि उपस्थित होते. नेर गावात पन्नासावर माजी सैनिक आहेत. देशासाठी त्याग केलेल्या माजी सैनिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार  करावा. शासन निर्णया नुसार माजी सैनिकांना हा लाभ मिळावा.या पार्श्वभूमीवर माजी सैनिक तथा उपसरपंच दत्तात्रय सोनवणे यांनी तशी सूचना मांडली. तशी मागणी या सैनिकांची होती. या विषयावर चर्चा होऊन, सकारात्मक पाऊल नेर ग्रामपंचायतीने घेतले आहे. जिल्ह्यातील पहिलाच ठराव हा असेल. ग्रामसभेत ग्रामस्थांच्या एक मताने तसा ठराव मंजूर करण्यात आला. ही अंमलबजावणी चालू वर्षांपासून करण्यात आली आहे. मात्र नळपट्टी ही भरावी लागणार आहे.

घरपट्टीची मागील थकबाकी पूर्णतः भरूनच आजपासून याचा लाभ घेता येणार आहे. तसा निरंक चा दाखला घ्यावा. यासाठी माजी सैनिकांनी सहकार्य करावे, असे ही ग्रामपंचायती तर्फे आवाहन करण्यात आले आहे.  गावातील ज्या माजी सैनिकांच्या नावाने घर असेल, त्यांनी ग्रामपंचायती कडे अर्ज करावा.जिल्हा परिषद सदस्य तुळशीराम गावित, पंचायत समिती सदस्य जबनाबाई सोनवणे, मंडळाधिकारी छोटु चौधरी , तंटामुक्ती अध्यक्ष नाना माळी, पोलीस पाटील शिवाजीराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. सतीश बोढरे, देविदास माळी ग्रामपंचायत सदस्य धर्मा माळी, नारायण बोढरे, पंकज वाघ, नामदेव बोरसे, दिलीप कोळी, सिद्धार्थ जैन, दिनेश सोनवणे, आर. डी.माळी, सिंधुबाई माळी,कोमल वाघ, बापू कोळी, संजय चौधरी, निर्मल आखाडे, योगेश गवळे, मोहन बोढरे, डाॅ. किरण बोढरे व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे पदाधिकारी व जाणता राजा युवा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच नेर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. 

तनिष्का सदस्याला ध्वजारोहणाचा मान
ध्वजारोहनाचा मान तनिष्का सदस्या तथा महिला ग्रामपंचायत सदस्या विजया नामदेव माळी यांना देवुन एक आदर्श निर्माण केला. एरव्ही ध्वजारोहण करण्यासाठी गावा गावात रस्सीखेच असते. मात्र नेर ग्रामपंचायतीचे सरपंच शंकरराव खलाणे यांनी महिला सदस्याला हा मान दिला.

Web Title: Dhule news ex armyman tax free