भडगावात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

सुधाकर पाटील
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

भडगाव  : शेतकऱ्यांच्या वतीने आज सकाळी चाळीसगाव चौफुलीवर आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

भडगाव  : शेतकऱ्यांच्या वतीने आज सकाळी चाळीसगाव चौफुलीवर आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सुकाणु समितीच्यावतीने नियोजित चक्का जाम आदोलन घोषित करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे तीन रस्त्यावर वीस मिनिटे वाहतुकीचा खोळंबा झाला. संपुर्ण कर्जमाफी झाली पाहीजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागु कराव्यात. भडगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा आदि घोषणांनी परीसर दणाणून गेला. माजी जिल्हा परीषद सदस्य दत्तात्रय पवार यांनी सरकारची कर्ज माफी फसवी असुन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नसल्याचे सांगतिले.

बाजार समीतीचे संचालक अॅड विश्वास भोसले यांनी शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणावर टीका केली. लोणपिराचे येथील प्रदिप देसले यांनी भाषणात सांगीतले की, शेतकर्याचे आदोलंन सध्या शांततेच्या मार्गाने सुरू आहे. मात्र शासनाने मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन शेतकरी उभे करतील असा इशारा त्यांनी दिला. सातबारा कोरा झाला पाहीजे. सरसकट पुर्णपणे कर्जमाफी केली पाहीजे. भडगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. 2016 चे दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावे. वीज बील माफ करावे. आदि मागण्यांचे तहसिलदार सी.एम.वाघ व पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांना निवेदन दिले.

यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य दत्तात्रय पवार, विकास पाटील, बात्सरचे संजय पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व्ही.एस.पाटील, जे. के. पाटील, लोणपिराचेचे प्रदिप देसले, नगरसेविका योजना पाटील, माजी उपसभापती संभाजी भोसले, वडजीचे सोसायटीचे माजी चेअरमन भिकन पाटील, राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष रविंद्र महाजन, खेडगावचे माजी प्रकाश पाटील, वडगावचे भय्यासाहेब पाटील, वडजीचे स्वदेश पाटील, नवल पाटील, संजय पाटील, शेखर पाटील, शरद पाटील, जाकीर अली सैय्यद, दत्तु मांडोळे, अमोल पाटील, संदिप पाटील, कैलास पाटील, तुषार पाटील, संजय पाटील आदि उपस्थित होते. 

Web Title: Dhule news farmer agitation in bhadgaon