नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील शिवाजीनगर (ता. साक्री) येथील अल्पभूधारक शेतकरी काशिराम गंगाराम ठेलारी (वय 47) यांनी नुकतीच नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी शेतात विषारी औषध प्राशन केले होते.

ठेलारी यांचे गुरुवारी (ता. 5) उपचारादरम्यान रुग्णालयातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज होते. त्यांची शिवाजीनगर शिवारात चार एकर शेतजमीन असून ते गेल्या तीन-चार वर्षांपासून नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत होते. शेतीत टाकलेले भांडवलसुद्धा निघत नव्हते. नुकतेच निजामपूर-जैताणे येथे सोमवारी (ता. 2) आठवडेबाजारानिमित्त आलेले असताना पिकांवर मारण्यासाठी फवारणीची औषधे व कीटकनाशके घेऊन ते शेतात गेले. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन केले.

घरच्यांना घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी साक्री ग्रामीण रुग्णालयात व तेथून पुढे धुळे जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. गुरुवारी उपचारादरम्यान धुळे जिल्हा रुग्णालयातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजीनगर येथे शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले. काशीराम ठेलारींच्या मृत्यूने शिवाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, निजामपूर पोलिस ठाण्यात अद्याप घटनेची नोंद झालेली नव्हती.

Web Title: dhule news farmer's suicide by bribing debt