ग्रामीण भागातील गणेश मूर्तीकारांच्या मूर्तींना मागणी     

एल. बी. चौधरी 
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

किशोर कुंभारच्या सुंदर व आकर्षक गणेशमुर्ती बनवतो. गेल्या वर्षीपासून किशोरने गणेश मुर्ती बनवून घाऊक व किरकोळ विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. येथे व परिसरात पन्नासहून अधिक गणपती विक्रेते आहेत. ते धुळ्याहून मूर्त्या आणतात. मात्र आता किशोरमुळे येथेच गणेशमुर्त्या मिळत आहे. कुंभारकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमुर्ती बनविण्याचे विविध आकाराचे साचे आहेत. त्याचा वापर करून गणेशाच्या विविध आकाराच्या अनेक मुर्ती तयार केले आहे.

सोनगीर जिल्हा धुळे : कसलेही प्रशिक्षण घेतले नाही, ना रंग, ना ब्रश याचा कसलाही गंध नाही. अल्पशिक्षित असलेल्या व पारंपारिक कुंभाराचा व्यवसाय असलेल्या किशोर महादू कुंभार हा तरुण श्रीगणरायाची सुबक व कलात्मक मूर्तीकार म्हणून लौकिक मिळवत आहे. त्याने तयार केलेली मूर्त्यांना परिसरात मोठी मागणी आहे. या कलाकाराची ख्याती हळूहळू पसरत आहे. गणेशोत्सव अद्याप दोन आठवडे दूर आहे. पण आजच त्याच्याकडे सात - आठ मोठे गणपती तर सुमारे चारशे लहान गणपतीची बुकींग झाली आहे. हजारो रुपयाची उलाढाल सुरु झाली आहे. मात्र पाऊस नसल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्मे पेक्षा कमी खप आहे. पुढे त्यात वाढ होईल अशी अपेक्षा कमी आहे. 

किशोर कुंभारच्या सुंदर व आकर्षक गणेशमुर्ती बनवतो. गेल्या वर्षीपासून किशोरने गणेश मुर्ती बनवून घाऊक व किरकोळ विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. येथे व परिसरात पन्नासहून अधिक गणपती विक्रेते आहेत. ते धुळ्याहून मूर्त्या आणतात. मात्र आता किशोरमुळे येथेच गणेशमुर्त्या मिळत आहे. कुंभारकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमुर्ती बनविण्याचे विविध आकाराचे साचे आहेत. त्याचा वापर करून गणेशाच्या विविध आकाराच्या अनेक मुर्ती तयार केले आहे.

विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी मंडळाची तयारी सुरु आहे. येथे मोठी 20 व लहान 50 गणेश मंडळे आहेत. मोठ्या मंडळांनी नंदूरबार व अन्य ठिकाणी मूर्त्या बुक केल्या आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने कुंभार यांनी वडिलोपर्जीत माठ, डेरे, मडके, रांजण तयार करायला सुरुवात केली. त्यानंतर कुतूहल पोटी गणरायाची प्रारंभी मातीची मूर्ती तयार केली. त्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या सुबक व  कलात्मक  मूर्ती बनविण्यात ते तरबेज झाले. सुरतहून रंगकाम शिकून घेतले.गणपती उत्सव हा विशिष्ट कालावधीपुरता असल्याने उर्वरीत काळात ते आजही पारंपारिक कुंभाराचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. येथील विठ्ठल रखुमाई पतसंस्थेे शेजारी किशोरचे काम रात्रंदिवस सुरू असते. तेथे गणरायाच्या लहान मोठ्या विविध अवतारातील मुर्ती ठेवल्या आहेत. काही तयार तर काही मुर्तींवर शेवटचा हात फिरवत आहे. यावर्षी मुर्तींच्या किंमतीतह वाढ झाली आहे. प्लॅस्टर अॉफ पॅरिसची दहा इंचापासून पासून ते दहा फुटापर्यंतचे गणपती तयार आहेत. 

यंदा पावसाळा चांगला होईल अशी अपेक्षा होती. अद्यापही आशा आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात अधिक उत्साह नसून गणेश मुर्ती विक्री व्यवसायात मंदी आहे. गेेल्या वर्षी आतापर्यंत दोन लाखांची कमाई केलीे होती. यंंदा 50 हजार रुपयांच्या मुर्ती देखील विकल्या गेल्या नाहीत. 
- किशोर महादू कुंभार, मूर्तीकार सोनगीर

Web Title: Dhule news ganesh statue in songir