धुळे जिल्ह्यात पावसासाठी महायज्ञ करून देवाला साकडे

धुळे जिल्ह्यात पावसासाठी महायज्ञ करून देवाला साकडे
धुळे जिल्ह्यात पावसासाठी महायज्ञ करून देवाला साकडे

सोनगीर (जि.धुळे): पावसाने दडी मारल्याने हवालदिल झालेली जनता पाऊस पडावा म्हणून पारंपरिक पद्धतीने परमेश्वराची आळवणी करीत आहेत. येथे दररोज धोंडी धोंडीचा घोष सुरू आहे. पर्जन्ययाग यज्ञ, नारळाचे झाड लावणे सामुहिक प्रार्थना आदी प्रयोग करून झाले. मात्र, रुसलेला वरुण राजा प्रसन्न होत नाही. या पार्श्‍वभूमीवर येथील कासारगल्लीतील श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात तारतमसागर या प्रणामी धर्मग्रंथाचे पारायणातून पावसाची आळवणी करण्यात आली. तसेच भव्य पर्जन्य महायज्ञ झाला. प्रणामी पंथाच्या येथील सर्व भाविकांनी महाआरतीचे आयोजन करून देवाला पावसासाठी साकडे घातले.

येथील श्रीकृष्ण प्रणामी मंदिर संस्थान ट्रस्ट व बाईजुराज महिला मंडल यांच्या सयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण प्रणामी धर्माचा मुळ ग्रंथ तारतम सागर या ग्रंथाचे गोटा पारायण महायज्ञं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राणनाथ ज्ञानकेंद्र मुंबई येथील विदुषी रचिता सखी प्रणामी यांच्या हस्ते पारायणाची सुरुवात झाली. या निमित्त मेहेरसागर पाठ तारतम मंत्र जप व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पारायण महायज्ञाची महाआरती श्रीकृष्ण प्रणामी संस्थान ट्रस्टचे सचिव अनिल वसंतराव कासार व रुपाली कासार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपसरपंच धनंजय कासार श्रीकृष्ण प्रणामी मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल कासार मंदिराचे पुजारी जगदीश कासार ट्रस्टी शामकांत कासार, सुरेश कासार, अविनाश कासार, उदय कासार, आर बी तांबट, गोविंद कासार, शाम कासार, वसंतराव कासार, प्रेमप्रकाश तांबट आदी उपस्थित होते. या तारतम सागर पारायण रायण ग्रंथाचे 18 भाग आहेत व 18758 ओळी आहेत.

या 18 ग्रंथाची नाव आहेत श्री रास, प्रकाश, षटऋतू, कलश, सनंध, किरंतन, खुलासा, खिलवत, परिक्रमा, सागर, सिंगार ,मारफत, छोटा कयामत नामा, बड़ा कयामत नामा आदी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विदुषी रचिता सखी म्हणाल्या की माणसाची बदललेली प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास व निसर्गाचा असमतोल झाला आहे. पाऊस न होणे, भूकंप, वादळे आदी नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित आपत्ती आहे. म्हणून निसर्गाला पर्यायाने भगवंताला साकडे घालण्याची वेळ आज येऊंन ठेपली आहे. म्हणून पारायण महायज्ञाचा माध्यमातून पर्जन्ययज्ञ करीत आहोत.

तारतम सागर ग्रंथाचे वाचन शोभा कासार, राजबाला कासार सुमती कासार, शशी कासार, कुंदा कासार रुपाली कासार, मीरा कासार, योगिता कासार, नीता कासार, भाग्यश्री कासार, भारती कासार, शशिकला कासार, शकुंतला कासार, बबिता कासार, संगीता कासार, प्रेमप्रकाश तांबट, संजय कासार, अनिता कासार, मंगला कासार, कीर्ती कासार, माधुरी कासार, योगेश कासार, शशिकला कासार, इंदुबाई कासार नलिनी कासार आदींनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण प्रणामी मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल कासार, पुजारी जगदीश कासार, संजय कासार, सुनील कासार, योगेश कासार, अशोक कासार आदिंनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com