धुळे तालुक्यातील 'आठ' गावातून फक्त 'दहा' हरकती

तुषार देवरे
बुधवार, 12 जुलै 2017

गुगल मॅपिंग
यावेळी प्रथमच  तालुक्यात गुगल मॅपिंग ने गावनिहाय प्रभाग रचना मोजण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारी चे प्रमाण गेल्या पंचवार्षिक पेक्षा कमी आपोआप झाल्या आहेत. आलेल्या तक्रारी ह्या तुलनेत किरकोळ स्वरूपाच्या आहेत. पारदर्शक पणे कामाचा हा प्रत्यय यंदा आला आहे. अन्यथा सोईचे राजकारण करण्यासाठी गाव पातळीवर मंडळाधिकार्याशी समझोता करीत प्रभाग रचना बदलली जात होती.

धुळे  - धुळे तालुक्यातील पस्तीस ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या सहा महिन्याच्या दरम्यान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. तीन ऑगस्टला जिल्हाधिकारी दिलिप पांढरपट्टे यांच्या मान्यतेने अंतिम मंजूरी व व्यापक प्रसिद्धि देऊन मान्य होणार आहे. मंगळवारी शेवटचा दिवस हरकती सादर करण्याचा होता. त्यात सायकांळपर्यंत धुळे तालुक्यातून आठ गावातील ग्रामस्थांनी 'दहा' प्रभाग रचनेच्या संदर्भात हरकती धुळे तहसिल कार्यालयात दाखल केल्या आहेत.

तालुक्यातील मोठ्या व राजकीय दृष्ट्या सजग असलेल्या गावांच्या या निवडणूका होत आहे. चार जुलैपासून तहसिलदारांनी प्रारूप भाग रचनेबाबत हरकती व सूचना मागविल्या होत्या.त्यानुसार आक्षेप असलेल्या ग्रामस्थांनी या हरकती नोंदविल्या आहेत. प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांची सुनावणी प्रातांधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे (15 जुलै) शनिवारी होणार आहे. आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणी नंतर अभिप्रायसह अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी दिलिप पांढरपट्टे यांच्याकडे 25 जुलै पर्यंत सादर केले जाणार आहेत. 31 जुलै पर्यंत प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी प्रभाग रचनेला व आरक्षणाला अंतिम मान्यता देऊन स्वाक्षरी करतील. तर तीन ऑगस्टला व्यापक प्रसिध्दी दिली जाईल.ग्रामपंचायत निवडणूकीचे पडघम या पस्तीस गावात वाजत आहे. राजकीय पटलावर या ग्रामपंचायतीत अस्तित्व टिकविण्यासाठी लोकप्रधिनिधी सक्रीय झाले आहेत. 

गुगल मॅपिंग
यावेळी प्रथमच  तालुक्यात गुगल मॅपिंग ने गावनिहाय प्रभाग रचना मोजण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारी चे प्रमाण गेल्या पंचवार्षिक पेक्षा कमी आपोआप झाल्या आहेत. आलेल्या तक्रारी ह्या तुलनेत किरकोळ स्वरूपाच्या आहेत. पारदर्शक पणे कामाचा हा प्रत्यय यंदा आला आहे. अन्यथा सोईचे राजकारण करण्यासाठी गाव पातळीवर मंडळाधिकार्याशी समझोता करीत प्रभाग रचना बदलली जात होती. आता मात्र त्या समझोत्याला फटका बसला आहे. तसेच थेट लोकांमधून सरपंच निवड होणार असल्याने आडमार्ग बंद झाले आहेत. त्याचा ही परिणाम या हरकतींवर झाला आहे. तक्रारी कमी आल्या आहेत.मात्र किती गावे बिनविरोध होतात. याकडे लक्ष वेधून आहे.

या आठ गावातील दहा हरकती अशा
वार--दोन, कुंडाणे (वार)--एक, आर्णी--एक, धनूर लोणकुटे--एक, अकलाड--एक, नावरा--दोन, बाभूळवाडी--एक, रतनपुरा--एक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhule news Gram panchayat election in Dhule district