तंटामुक्त गाव पुरस्काराच्या निधीतून टँकरखरेदी व लोकार्पण

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 19 मार्च 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील खुडाणे (ता. साक्री) ग्रामपंचायतीतर्फे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवारपासून (ता. १८) गावकऱ्यांना नाममात्र शुल्कात पाच हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर उपलब्ध करुन देण्यात आले. ग्रामपंचायतीला गेल्या वर्षी मिळालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्काराच्या निधीतून ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीतर्फे ही सोय निर्माण करुन देण्यात आली आहे.

गावात साखरपुडा, लग्नसोहळा, उत्तरकार्य आदी कार्यक्रमांत ग्रामस्थांची पाण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामपंचायतीतर्फे नाममात्र शुल्कात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. उपसंरपच नामदेव माळी, संरपच प्रतिनिधी पराग माळी, ग्रामसेवक श्री. मोहिते, माजी संरपच धनराज माळी आदींच्या हस्ते उदघाटन झाले. बबलू महाजन यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कन्हैयालाल काळे, अशोक खलाणे, गोरख देवरे, विनोद गवळे, महेंद्र हेमाडे, नाना धनगर, वाघ सर, बबलु महाजन आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीने नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिलेल्या ह्या सुविधेबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

"आगामी काळात ग्रामपंचायतीतर्फे महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्काराच्या निधीतून व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावकऱ्यांना पाच रुपयात वीस लिटर फिल्टरचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे." अशी माहिती सरपंच प्रतिनिधी पराग माळी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: dhule news gram panchayat tanta mukti amount and water tanker